सातबारा Watch

← विटा (बु.)

Ferfar #3563 · विटा (बु.)

पाथ्री, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
रमेश मधुकर तोंडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र २०२६/जमा/८५ (२)/कावी-२१५ आदेश दिनांक : 30/10/2026 मौजे विटा बु. ता. पाथरी येथील शेतजमीन गट नंबर ४२ , एकूण क्षेत्र १.४० हे.आर. व पो.ख. ०.०४ हे.आर. ही जमीन भोगवटदार वर्ग-१ ची असून, ती श्री प्रद्युम्न दत्तराव आरबाड (खाता क्र. ७३३) यांच्या नावावर स्वतंत्र खाते म्हणून नोंदलेली होती. माननीय नायब तहसीलदार (महसूल-१), तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश क्रमांक जा.क्र २०२६/जमा/८५ (२)/कावी-२१५ दिनांक ३०.१०.२०२६ अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ (२) व महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ नुसार या जमिनीची आपसी सहमतीने कौटुंबिक हिस्से वाटणी मंजूर करण्यात आली आहे. सदर आदेशानुसार, खालीलप्रमाणे नवीन उपविभाग पाडून नवीन खातेदाराचे नाव दाखल करण्यात येत आहे: श्रीमती शारदा नामदेव चोपडे (खाता क्र. ७२३७) यांना सदर गट नं. ४२ पैकी क्षेत्र ०.६० हे.आर. व पो.ख. ०.०० हे.आर. जमीन वाटणीने प्राप्त झाली असल्याने, त्यांचे नाव नवीन हिस्सेदार म्हणून सदर क्षेत्रावर मालक सदरी दाखल करण्यात येत आहे. उर्वरित हिस्सा क्षेत्र ०.८० हे.आर व व पो.ख. ०.०४ हे.आर. हे मुळ मालक श्री श्री प्रद्युम्न दत्तराव आरबाड (खाता क्र. ७३३) यांच्या नावावर राहील. (सदर आदेशानुसार इतर हक्कातील जुने संबंधित शेरे व बोजे जसेच्या तसे कायम ठेवण्यात येत आहेत) आदेशावरून नोंद घेतली.