Ferfar #5344 · पिरकल्याण
जालना, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आदेश क्रमांक 2024/आरओआर/सिआर- 198 व आदेश 2026/आरओआर/ सिआर - 13
आदेश दिनांक : 01/06/2026
मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जालना यांचे न्यायालयातील संचिका क्रमांक 2024/आरओआर/सिआर- 198 व संचिका क्रमांक 2026/आरओआर/ सिआर - 13 प्रकरण दाखल दिनांक 13/09/2024 व निकाल दिनांक 01/06/2026 च्या आदेशानुसार मौजे पिरकल्याण ता.जि.जालना येथील गट क्र 215, 217 संदर्भातील आदेशप्रमाणे:
अपिलार्थी यांचे अपील मंजूर करण्यात आले आहे. सदर आदेशान्वये तहसीलदार जालना यांनी दिनांक 06/09/2016 यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी रामनगर यांनी मंजुर केलेले फेरफार क्र. 2985 व 2986 रद्दबातल ठरविण्यात येत आहे.
या अनुषंगाने आदेशातील अपिलार्थी यांचे नाव यापूर्वीची 7/१२ अभिलेखानुसार गट क्र. 215 मध्ये 1.निलाबाई लक्ष्मण 2.कलाबाई लक्ष्मण अ.पा.क. खंडेराव गजाबा या नावाची नोंद पूर्ववत करण्यात येत आहे.
तसेच गट क्र. 217 मध्ये यापूर्वीची लिलाबाई लक्ष्मण, कलाबाई लक्ष्मण अ.पा.क. खंडेराव गजाबा यांच्या सामाईक नावाची नोंद पूर्ववत करण्यात येत आहे.
वरीलप्रमाणे मा. उपविभागीय अधिकारी यांचे आदेशान्वये संचिका क्रमांक 2024/आरओआर/ सिआर - 198 व संचिका क्रमांक 2026/आरओआर/ सिआर - 13 प्रकरण दाखल दिनांक 13/09/2024 व निकाल दिनांक 01/06/2026 प्राप्त झाल्यानुसार सदरची नोंद घेण्यात आली.