Ferfar #10744 · जामखेड
अबंड, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1225
- Talathi
- अविनाश पांडुरंग देवकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार: विठ्ठल गेणुजी जाधव
लिहून घेणार: 1) तुळशीराम विठ्ठल जाधव
2) प्रभाकर विठ्ठल जाधव
3) संभाजी विठ्ठल जाधव
मौजे जामखेड, ता. अंबड, शिवारातील वडीलोपार्जीत कुटुंबातील शेतजमीनीचे वाटणी स्मरणपत्र लिहून घेणार व देणार यांच्या संयुक्त मालमत्तेच्या पुर्वीच वाटण्या झालेल्या असल्याने त्यानुसार राजस्व कागदोपत्री नोंद व्हावी म्हणून हे विनामोबदला वाटणी स्मरणपत्र शपथेवर लिहून देत आहे की, मौजे जामखेड येथील शेतजमीन गट नंबर 1225 मधील लिहून देणार विठ्ठल गेणुजी जाधव यांनी क्षेत्र 02 हे 96 आर संपुर्णजमीन माझी मुले लिहून घेणार 1) तुळशीराम विठ्ठल जाधव यांना क्षेत्र 0 हे 98.50 आर जमीन व लिहून घेणार 2) प्रभाकर विठ्ठल जाधव यांना क्षेत्र 0 हे 98.50 आर जमीन तसेच लिहून घेणार 3) संभाजी विठ्ठल जाधव यांना क्षेत्र 0 हे 99.00 आर जमीन स्वतंत्रपणे वाटून दिली, आपसातील सामंजस्याने व विनामोबदला वाटून दिली आहे. सदर जमिनीचा ५००/- रु. स्टँप पेपर क्रमांक DG 826509 वरील वाटणीपत्रांच्या आधारे प्रत्यक्ष मालकी हक्क व ताबा पूर्वीच सुपूर्द करण्यात आला आहे. सदरचे वाटणीपत्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५[२] ला तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी याचिका क्र. २८१५ / २००२ श्री अरविंद यशवंतराव देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. जमीन ०७/२०१४/प्र.क्र. १३० / ज-१ दि. १६ जुलै २०१४ च्या आधारे अधिकार अभिलेखात स्वतंत्र नोंद घेण्यास पात्र ठरत असल्याने, भविष्यात मुद्रांक शुल्क भरण्याची वेळ आल्यास त्यास अधीन राहून सदरची फेरफार नोंद घेतली असे.