Ferfar #4904 · दुनगांव
अबंड, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- सिताराम मन्साराम जारवाल
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा. तहसीलदार तथा मामलतदार, अंबड यांच्या कार्यालयाकडील जा.क्र. २०२६/जमा-१/कावी-सोआर-१४८दिनांक १८/०९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ अंतर्गत प्राप्त आदेशानुसार मौजे दुनगाव येथील गट क्रमांक १०७ च्या संगणकीकृत अधिकार अभिलेख (७/१२) मध्ये झालेल्या तांत्रिक/लेखनिक चुकीची दुरुस्ती करण्यासाठी खालीलप्रमाणे फेरफार नोंद घेण्यात येत आहे.१. फेरफार क्रमांक ३६२१ बाबत मंजूर फेरफार क्रमांक ३६२१ चा अंमल संगणकीकृत ७/१२ अभिलेखावर तांत्रिक चुकीमुळे पूर्णतः न झाल्याने सदर फेरफाराचा अंमल पूर्ववत पुनर्जीवित करण्यात येत आहे. खातेदार श्रीमती चंद्रभागाबाई बापूराव जायभाये यांच्या नावावरील एकूण १.३३ हे.आर. क्षेत्रापैकी १.२० हे.आर. क्षेत्र कमी करून त्यांच्याकडे ०.१३ हे.आर. क्षेत्र कायम ठेवण्यात येत आहे. उर्वरित १.२० हे.आर. क्षेत्रापैकी खालीलप्रमाणे त्यांच्या तीन मुलांची नावे व क्षेत्र धारण अधिकारासह दाखल करण्यात येत आहेत.
१. श्री. अर्जुन बापूराव जायभाये ०.४० हे.आर.
२. श्री. सुभाष बापूराव जायभाये ०.४० हे.आर.
३. श्री. भाऊसाहेब बापूराव जायभाये ०.४० हे.आर.
२. फेरफार क्रमांक ४२५३ बाबत मंजूर फेरफार क्रमांक ४२५३ चा अंमल संगणकीकृत ७/१२ अभिलेखावर तांत्रिक चुकीमुळे पूर्णतः न झाल्याने सदर फेरफाराचा अंमल पूर्ववत पुनर्जीवित करण्यात येत आहे. गट क्रमांक १०७ मधील ०.८० हे.आर. क्षेत्राबाबत खातेदार श्री. दिलावर बहादूरखाँ पठाण यांच्या नावाऐवजी त्यांचे वारस/मुलगा श्री. अकबर दिलावर पठाण यांचे नाव खातेदार म्हणून दाखल करण्यात येत आहे.सदर दुरुस्ती मा. तहसीलदार तथा मामलतदार, अंबड यांच्या दिनांक १८/०९/२०२६ रोजीच्या आदेशानुसार नोंद दर्ज.