सातबारा Watch

← गंगाचिंचोली

Ferfar #1578 · गंगाचिंचोली

अबंड, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-05-19
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
दीपक गोपीनाथ लव्‍हाळे
First seen
20h ago

Notice text

​नोंदीचा प्रकार: आदेश व दस्तावेज अधिकारी: मा. उपविभागीय अधिकारी, अंबड आदेश क्रमांक: २०२४/आरओआर/अपील/१२० आदेश दिनांक: २०.११.२०२५ मसुदा: मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अंबड यांच्या न्यायालयीन प्रकरण क्रमांक २०२४/आरओआर/अपील/१२० मधील दिनांक २०.११.२०२५ रोजीच्या आदेशान्वये, मौजे गंगाचिंचोली ता. अंबड येथील गट क्रमांक ८३ मधील क्षेत्राबाबत मंडल अधिकारी, गोंदी यांनी दिनांक १३.०६.२०२४ रोजी फेरफार क्रमांक १४२६ प्रमाणित करण्याबाबत दिलेला न्यायनिर्णय सदर आदेशान्वये रद्द करण्यात आला आहे. त्यानुसार फेरफार क्रमांक १४२६ ची नोंदणीकृत खरेदीखतावर आधारित नोंद सध्या तात्पुरती नामंजूर करण्यात येत आहे. तसेच, सदर मिळकतीबाबत मा. दिवाणी न्यायालय, अंबड येथे दिवाणी दावा क्र. ३९३/२०२३ प्रलंबित असल्याने, या दाव्याच्या अंतिम निकालावरच या क्षेत्राची पुढील महसूल नोंद अवलंबून राहील, अशी तंट्याची नोंद महसूल अभिलेखात घेण्यात येत आहे. तसेच सदर आदेशानुसार फेर क्रमांक १४२६ रद्द करून खरेदीदार गंगा रमेश गुळवणे यांची १.०० हे जमीन मूळ विक्रेता चंद्रकांत श्रीपती जाधव यांचे नावे घ्यायची असल्याने, परिणामी, फेरफार क्रमांक १४२६ मधील हक्कावर आधारित असलेला पुढील वाटणी फेरफार क्रमांक १४९३ ज्याद्वारे गंगा रमेश गुळवणे यांनी मुलगा गणेश रमेश गुळवणे यांना 0.60 आर जमीन दिलेली आहे तो देखील रद्द करण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.