Ferfar #4284 · शहानुरवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/05/2026
आदेशाने – हिबा (Gift)
अर्जदार मुर्तुजा हुसेन अब्दुल तैय्यब अंबावाला व नुरूद्दीन फकरूद्दीन लाखवाला, रा. शहानुरवाडी यांनी तलाठी कार्यालयात दिनांक 29.07.2022 रोजी अर्जासह 1 ते 84 प्रतिच्या कागदपत्रासह तजमुल हुसैन मुल्ला मुमताज हुसेन अंबावाला यांनी साधे कागदावरील हिबा (Gift) आधारे केलेल्या मौजे शहानुरवाडी सर्व्हे नंबर 9/2 मधील 04 एकर 26.33 गुंठे व सर्व्हे नंबर 11 मधील 05 एकर 18 गुंठे क्षेत्राची जमीनीचा अर्जदार यांच्या नावाचा अंमल 7/12 रेकॉर्डला मालक व कब्जेदार म्हणून घेण्याची विनंती केली. याबाबत मा. अपर तहसिलदार कार्यालयायत तलाठी यांनी हिबा देणार मयत असणे, सिटिएस चा उल्लेख असणे इ. सविस्तर 1 ते 7 मुद्यावर मुळ संचिकेसह अहवाल सादर केलेला आहे. प्रकरणात अर्जदार यांनी तलाठी यांना दिनांक 25.09.2023 रोजी पुन्हा: विनंती अर्ज मा. अपर तहसिलदार औरंगाबाद यांचे आदेश प्र.क्र.2022/जमा-2/सिआर-47, दिनांक 20.07.2023 चे आदेशाची साक्षांकित प्रत दाखल करून मौजे शहानुरवाडी सर्व्हे नंबर 9/2 पैकी 04 एकर 26.33 गुंठे व सर्व्हे 11 पैकी 05 एकर 18 गुंठे इतके क्षेत्र अर्जदार 1. मुर्तुजा हुसेन अब्दुल तैय्यब अंबावाला, 2. नुरूद्दीन फकरूद्दीन लाखवाला यांच्या नावे दिनांक 02.01.2015 रोजीच्या हिबा (Gift) आधारे म.ज.म.अ. 1966 चे कलम 149 नुसार अधिकार अभिलेखात (7/12) मध्ये नोंद घेण्याबाबत तलाठी यांना आदेशित केल्याने फेरफार नोंद घेण्यात आली होती. सदर प्रकरणात मा. तिसरे दिवाणी न्यायाधीश औरंगाबाद यांचे कडील दिवाणी दावा क्रमांक 15/2018 मधील आदेश दिनांक 08/06/2019 व दिनांक 19/10/2023 Exh.79 अन्वये मा.अपर तहसीलदार साहेब यांनी जा.क्र. 2023/जमा-2 प्र.क्र.114 दि. 07/08/2023 अन्वये सदरील प्रकरण सुप्त अवस्थेत ठेवण्यात येत आहे असे आदेश पारित केले असल्याने मा. अपर तहसीलदार यांचे आदेश जा.क्र.2026/155 कावि दिनांक 25/5/2026 अन्वये मौजे शहानूरवाडी गट क्र./सर्वे क्र.9/2 व 11 मधील प्रलंबित फेरफार क्रमांक 3734 तात्पुरत्या स्वरूपात नामंजूर करून पुनःश्च फेरफार नोंद घेण्याचे आदेशित केल्याने फेरफार नोंद घेण्यात आली जी पुढील आदेशास्तव सादर.