सातबारा Watch

← लोणी बु.

Ferfar #3661 · लोणी बु.

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
नागेश गोविंदराव शिवुरकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार भाऊसाहेब भानुदास रिठ्ठे (खाता क्र. 172) रा लोणी बु. ता वैजापूर यांनी अर्ज व 500 रु दस्तावर वाटणीपत्र सादर करून कळविले कि त्यांनी मौजे लोणी बु. शिवारातील शेतजमीन गट न. 4 ज्याचे एकूण क्षेत्र 2 हे 87 आर, पो ख 0 हे. 12 आर, पैकी लिहून देणार यांचे मालकीचे व ताब्यातील क्षेत्र 1 हे 43 आर, पो ख. 00 हे.00 आर पैकी 0 हे. 80 आर क्षेत्र, संपूर्ण हक्कासह आणि फेर क्र. 2187 नुसार भाऊसाहेब भानुदास रिठ्ठे यांच्या नावावरील विहीर त्यांनी लिहून घेणार ईश्वर भाऊसाहेब रिठ्ठे (खाता क्र. 2884) यांना वाटून देऊन व ताब्यात दिले आहे . लिहून देणार व घेणार हे एकत्र कुटुंबातील आपापसात रक्ताचे नातेवाईक असून आपसात कुटुंब व्यवस्थापनाचे सोयीने व जमिनीत प्रत्यक्ष वहिवाट असल्यावरून जमिनीचे वाटप सरस निरस मानाने केले आहे ते बरोबर असलेबाबत संमतीपत्र अर्जासोबत सदर केले आहे. सदर वाटणीपत्र संबंधितांनी कोणत्याही प्रकारची नशापाणी न करता वाचून समजून करून दिले आहे तसेच या बाबतीत भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास याची जबाबदारी संबंधितावर राहील असेहि त्यात नमूद केलेले आहे करिता जाहीर प्रगटन काढले, संबंधितांचे जबाब नोंदविले. अर्ज व 500 रुच्या दस्तावर वाटणीपत्र प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.