सातबारा Watch

← मुर्शदपुर

Ferfar #1102 · मुर्शदपुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जदार श्रीमती.अलकाबाई गोरख कदम , रा. मुर्शदपूर यांनी अर्ज, मा.दिवानी न्यायाधिस साहेब कनिष्ठ स्तर वैजापूर यांचे न्यायालयात तडजोड पत्र सादर करून कळविले कि, धनको श्रीमती.अलकाबाई गोरख कदम विरुद्ध ऋणको 1.माधव बाळा कदम, 2. कैलास माधव कदम , 3.संगीता कैलास कदम यांच्यात मौजे मुर्शदपूर येथील ग.नं.72 बाबत न्यायालयात वाद चालू होता ज्याचा RCS No. 09/2024 हा होता , सदर प्रकरणात 27/11/2025 ला तडजोड होवून मौजे मुर्शदपूर येथील ग.नं.72 मधील श्रीमती.अलकाबाई गोरख कदम यांच्या नावावरील 1 हे. 56 आर क्षेत्राच्या वाटणीत जाण्या येण्यासाठी ऋणको 2. कैलास माधव कदम यांच्या 1 हे. 96 आर क्षेत्रा पैकी उत्तर बाजूकडून त्यांच्या हद्दीतून धनको श्रीमती.अलकाबाई गोरख कदम यांना पूर्व पश्चिम असा साडे नऊ फुट रुंदीचा व 940 फुट लांबीचा रस्ता कायम स्वरूपी धनको श्रीमती.अलकाबाई गोरख कदम यास दिला आहे. असे कि, सदर रस्त्यासाठी ऋणको नं 2 कैलास यांचे क्षेत्रातून 8 गुंठे क्षेत्र हे धनको अलकाबाई हिचे रस्त्यासाठी देण्यात आले आहे. त्या रस्त्याच्या मोबदल्यात तिचे पूर्वे कडील क्षेत्रातून 3 गुंठे क्षेत्र हे ऋणको नं 2 कैलास माधव यांना दिले आहे. सदर 03 गुंठे क्षेत्र हे कैलास माधव कदम यांच्या हाळाच्या बांधाच्या पूर्वेस दिले आहे. त्या रस्त्याच्या 8 गुंठे क्षेत्राचा गट नं 72 मधील ऋणको नं 2 कैलास यांच्या क्षेत्रातून रितसर नोंद घेण्यात येईल. तसेच धनको अलकाबाई यांचे 3 गुंठे जमीन हि ऋणको कैलास हे मालक व ताबेदार असतील व त्यांचे नाव ७/१२ मध्ये नोंद घेण्यात यावी इत्यादी तडजोड पत्र मध्ये नमूद आहे. करिता अर्ज व मा.दिवानी न्यायाधिस साहेब कनिष्ठ स्तर वैजापूर यांचे न्यायालयात तडजोड RCS No. 09/2024 दस्त प्राप्त झाल्याने मौजे. मुर्शदपूर गट क्र.72 मध्ये नोंद घेण्यात आली.