Ferfar #1122 · तळेसमन
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-10-09
- Objection until
- 2025-11-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- दीपाली अशोक गुल्हाणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/06/2025आदेशाने:-
अर्जदार श्री गणेश गंगाधर जाधव रा.आसेगाव ता.गंगापूर यांनी अर्ज व त्यासोबत मा.उपविभागीय अधिकारी जि.छत्रपती संभाजीनगर यांचे’ न्यायालयीन प्रकरण कमांक 2022/अपील/म.ज.म.अ./सिआर-159 निर्णय दिनांक 21/08/2024,तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे न्यायालयीन प्रकरक्र.2024/अपील/एमएलआरसी/सीआर-114 निर्णय दिनांक 19/06/2025 ची छायाप्रत दाखल करून कळविले कि.मौजे तळेसमान येथील गट नं30 पैकी क्षेत्र 0.40 आर जमीन क्षेत्र हे जमिनीचे मूळ मालक श्री.कृष्णा शामराव शेळके’(मयत) यांचेकडून नोंदणीकृत खरेदीखत क्रमांक 2108/2017 दि.23/04/2017 आणि 0.09 आर जमीन क्षेत्र हे नोंदणीकृत दस्त क्र.4344/2017 दि.21/09/2017 रोजी असे एकूण 0.49 आर जमीन क्षेत्र खरेदी केले असून आज रोजी मालकी व ताब्यात आहे.परंतु सदरील खरेदीखता आधारे फेरफार नोंदविण्यात न आल्यामुळे 7/12 गटावर मूळ जमीन मालक श्री कृष्णा शामराव शेळके यांचे नाव कायम असल्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस 1.श्रीमती वंदना कृष्णा शेळके 2.दिपक कृष्णा शेळके अपाक श्रीमती वंदना कृष्णा शेळके (आई) 3.श्री.विशाल कृष्णा शेळके अपाक वंदना कृष्णा शेळके (आई) यांनी ग्राम महसूल अधिकारी आसेगाव यांचेकडे वारसाची कागदपत्र व अर्ज सादर करून वारस फेरफार घेणे बाबत कळविले त्यानुषंगाने वारस फेरफार क्रमांक 886 नोंदविण्यात येऊन मंजूर करण्यात आला आहे.परंतु सदरील जमीन क्षेत्र हे अर्जदार श्री गणेश गंगाधर जाधव यांनी यापूर्वीच मूळ जमीन मालक श्री कृष्णा शामराव शेळके यांचेकडून नोंदणीकृत खरेदीखता आधारे खरेदी केलेले असल्यामुळे व सदरील बाब ही त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदरील वारस फेरफार बाबत मा.उपविभागीय अधिकारी वैजापूर यांचे न्यायाधीकरणासमोर अपील दाखल करण्यात आले.प्रकरणात अपिलार्थी श्री गणेश गंगाधर जाधव आणि गैर अपिलार्धी वंदना कृष्णा शेळके(आई) यांना प्रकरणात येऊन तसेच त्यांचे विवीज्ञ यांचे सुनावणी दरम्यान तोंडी/लेखी युक्तिवाद एकूण येऊन गट नं30 मध्ये नोंदविण्यात आलेला वारस फेरफार 886 रद्द करण्यात येऊन नोंदणीकृत खरेदी खत क्रमांक 2108/2017 दि.4344/2017 दि.21/09/2017 अपिलार्थी श्री गणेश गंगाधर जाधव यांचे नावे फेरफार नोंदविणे बाबत आदेश पारित करण्यात आले आहे.
करिता मा.उपविभागीय अधिकारी वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांचे न्यायालयातील प्रकरण क्रमांक 2022/अपील/म.ज.म.अ./सिआर 159 निर्णय दिनांक 21/08/2024,तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे न्यायालयीन प्रकरण क्र.2024/अपील/एमएलआरसी/सीआर-114 निर्णय दिनांक 19/06/2025 नुसार नोंद घेण्यात आली जि पुढील आदेशास्तव सादर.