Ferfar #346 · कुकुडमुंडा
सुरगाणा, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
यशोदा महारु बंगाळ रा. (खाता क्रमांक233) यांचे गट/सर्व्हे क्रमांक127, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
यशोदा महारु बंगाळ रा. (खाता क्रमांक233) गट/सर्व्हे क्रमांक174, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्योती इंद्रजीत गावित यांना दुय्यम निंबधक सुरगाणा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 808/2026 दिनांक-18-09-2026 प्रमाणे रक्कम रुपये 1421000.00 घेऊन खरेदी दिली. सदर शेतजमीन आदिवासी शेतजमीन असून सदर बाबत अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक कक्ष-4/कुका-6/एसआर/341/2025 दिनांक-31/08/2026 प्रमाणे खालील अटी व शर्तीना अधीन राहून परवानगी घेण्यात आली आहे.
अटी व शर्ती-
1.श्रीमती. यशोदा महारु बंगाळ यांची जमीन श्रीमती. ज्योती इंद्रजीत गावित यांनाच विक्री करता येईल.2. श्रीमती ज्योती इंद्रजीत गावित यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधीन राहून फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी.
3. जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरुन ही परवानगी देण्यात येत आहे.जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निर्देशनास आल्यास महाराष्ट्र अनुसूचित जमातीना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहिल.
4. खरेदीदस्तावर जमीन मालक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी.
5. जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासून पंधरा (15) दिवसानंतर तीन (03) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.
6. इतर अधिकारातील कर्ज बोजा बाबत संबंधित वित्तीय संस्थेचा नाहरकत दाखला खरेदी दस्तात समाविष्ठ करुन खरेदीदस्त नोंदणीकृत करण्यात यावे.
7. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहील.
8. प्रश्नाधिन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसुली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील.
9. सदर गटात भूसंपादन झाले असल्यास भूसंपादीत क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील.
10. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही.
11. सदर जमीनीचे साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु.6,50,000/-ही असून मुल्यांकनाची रक्कम रु.6,26,000 +7,95000 = 14,21,000/- एवढी आहे. साठेखतातील व्यवहाराच्या रक्कमेपेक्षा मुल्यांकनाची रक्कमेपेक्षा जास्त असल्याने मुल्यांकनाची रक्कम ही जमीनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे रक्कम रु. 14,21,000/-(अक्षरी चौदा लाख, एकवीस हजार रु. मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व या बाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा झालेबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये.
12. प्रस्तुत मिळकती संबंधित भुधारकाचे एकुण क्षेत्र व लागु असलेला स्लॅब विचारात घेवुन निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नवीन भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नवीन भुधारकाचे एकुण क्षेत्र लागु असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नवीन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमूद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील.
13. तहसीलदार सुरगाणा / ग्राम महसूल अधिकारी, कुकुडमुंडा यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडुन धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये.
14. प्रस्तावित व्यवहारात खालील कायदयाचे निबंध लागू राहतील.
अ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.बा.क.म)-1961
ब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम-1948
ड) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम-1974 (1974/35)
ई) सदरची परवानगी फक्त याच कायदयातंर्गत देण्यात आली आहे. या संबंधीत नागरी जमिन (कमाल) मर्यादा विनियमन) अधिनियम-1966 किंवा अन्य कोणत्याही कायदयानुसार व नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.वरीलपैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रह होणेस व शास्तीस पात्र राहील.
सबब अर्ज, सूची क्रमांक 2 मूळप्रत, दस्ताची छायांकित प्रत व शेतकरी पुरावा म्हणून खरेदी घेणार यांनी जोडलेला त्यांचे पती नामे इंद्रजीत जीवा गावित असलेला मौजे घागबारी येथील जोडलेला गट नं.154 चा 7/12 उतारा दिलेवरून फेरफार नोंद घेतली असे.