सातबारा Watch

← रवळजी

Ferfar #1720 · रवळजी

कळवण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
19/1
Talathi
हेमंत गोपाळराव देशमुख
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- भारत दोधु जगताप रा. रवळजी(खाता क्रमांक139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वंदना भास्कर भालेराव , (खाता क्रमांक :-582)गट/सर्व्हे क्रमांक 19/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळवण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1972 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1444000 घेऊन खरेदी दिली. अटी व शर्ती १) मौजे. रवळजी ता. कळवण जि. नाशिक येथील अर्ज मिळकत खरेदी घेणार सौ. वंदना भास्कर भालेराव हे खरेदीनंतर भोगवटादार वर्ग-२ नविन अविभाज्य शर्तीवर व शेती कामासाठीच धारण करतील. २) खरेदीखतावरील सर्व धारकांची सह्या कराव्यात. ३) शेती व्यतिरीक्त अन्य प्रयोजनार्थ जमिनीचा वापर करावयाचा असल्यास त्या वेळच्या प्रचलित बाजारभावाच्या किंमतीच्या ५० टक्के इतकी रक्कम व पूर्वी भरणा केलेल्या सा-याच्या १० पट नजराणा यातील फरका इतकी रक्कम शासनास भरणा करणे बंधनकारक राहील, असा शेरा अर्ज मिळकतीच्या ७/१२ उता-यावर इतर हक्कात घेण्यात यावा. ४) जमीनीचा विक्री व्यवहार हा तीन महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा अन्यथा दिलेली परवानगी आपोआप रद्द होईल. ५) सदरच्या विक्री व्यवहाराला खालील कायद्याच्या तरतूदी लागू राहतील. अ) महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ ब) मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम कायदा १९४८ क) इतर कायद्याच्या तरतूदी ड) तुकडेबंदी तुकडेजोड कायदा १९४७ ६) प्रकरणी समाविष्ट जमिन खरेदी घेणार व देणार यांचेमधील साठेखत करारनामा व दुय्यम निबंधक यांचेकडील मुल्यांकन दाखला पहाता. मौजे रवळजी ता. कळवण जि. नाशिक येथील अर्ज मिळकतीचे रक्कम रू.१२,२०,०००/- (अक्षरी बारा लाख वीस हजार मात्र) निश्चीत करण्यात येत आहे. ७) खरेदीदार अर्ज मिळकती विकत घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण करणार नाही व अशा प्रकारची परवानगी देणे किंवा नाकारणे हे जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात राहील. ८) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणांमध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्र यांच्यामध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळुन आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील. ९) खरेदीदाराने जमिनीचा उपयोग फक्त कृषिक प्रयोजनार्थ करावा. या व्यतिरीक्त इतर कारणासाठी उपयोग करावयाचा झाल्यास जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. अशी परवानगी द्यावयाची ठरल्यास नियमानुसार अनर्जित उत्पन्नाची रक्कम शासनास अदा करावी लागेल. १०) सदरचे जमीनीच्या ७/१२ उता-याच्या इतर हक्कात जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी असा शेरा घेण्यात यावा. ११) जमीन खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा व प्रतिज्ञापत्र दिल्यावरून ही परवानगी देण्यात येत आहे. सदरचे पुरावं अवैध ठरल्यास खोटी माहिती देऊन जमिन खरेदी केली असे मानुन सदर जमीन शासन जमा केली जाईल. १२) भविष्यात लेखापरिक्षणात नजराणा कमी भरणा झाला असलेबाबत शक निघाल्यास फरकाची रक्कम भरणा करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील. १३) भविष्यात प्रस्तुत मिळकतीचा अकृषिक वापर करावयाचा झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार सक्षम प्राधिकारी यांचेकडुन अकृषिक परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहीलं. १४) अर्ज मिळकतीच्या मालकी अथवा हस्तांतरण हक्काबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचे वाद प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडुन पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीच्या हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहतील, १५) अधिकार अभिलेख व जमीनीच्या मालकी हक्काबाबत व इतर हक्कांबाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास व त्यामध्ये काही तथ्य आढळल्यास तसेच मालकी हक्काबाबत काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास किंवा सदर मिळकतीबाबत न्यायालयाचे काही निर्णय झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांची राहील. १६) अर्जदार यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास तसेच मिळकतीच्या क्षेत्राबाबत तफावत आढळून आल्यास अगर प्रचलित कायदा व नियमांचा भंग झाल्यास व चौकशी अंती सत्यता आढळुन आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील. १७) या आदेशातील कोणत्याही शर्त अगर अटींचा भंग झाल्यास सदरला परवानगी रद्द होण्यास पात्र राहील. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद सूची क्र.2, अपर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव आदेश क्र. वतन / एस आर / 02 /2026 मालेगाव दि. 24/09/2026 वरोन घेण्यात आली आहे