Ferfar #3698 · पिळकोस
कळवण, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 346/2
- Talathi
- राजेंद्र दिनकर गरुड
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार कळवण
आदेश क्रमांक : वाटप एस. आर/ 65 /2026
आदेश दिनांक : 26/10/2026
सत्ताप्रकार / धारणाधिकार भोगवटादार 1/2 या शेतजमीनीच्या विभाजननासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 अन्वये सौ. रेखा भाऊसाहेब शेवाळे रा. खामखेडा ता. देवळा जि. नाशिक यांनी तहसीलदार कळवण यांचे कडे दि. 27/08/2026 रोजी अर्ज केला आहे. सौ.रेखा भाऊसाहेब शेवाळे , आशाबाई अरुण शेवाळे रा. खामखेडा ता. देवळा त्यांच्या मालकीच्या असलेल्या जमिनी चे मौजे पिळकोस ता. कळवण जि. नाशिक येथील खालीलप्रमाणे क्षेत्र आहे.
गाव – भादवन गट नं. गट नं. 346/2 पै क्षेत्र 1.3550 हे. आर पो.ख 0.59 हे. आर एकूण 1.9450 हे. आर आकार 1.50 रु. पै दिशा – पूर्व कब्जेदार सदरी दाखल नाव - रेखा भाऊसाहेब शेवाळे , आशाबाई अरुण शेवाळे
सदर जमिनीच्या वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे
1.गाव – पिळकोस गट नं. गट नं. 346/2 पै क्षेत्र 0.68 हे. आर पो.ख 0.29 हे. आर एकूण 0.97 हे. आर आकार 0.75 रु. पै दिशा उत्तर कब्जेदार सदरी दाखल करावयाचे नाव - रेखा भाऊसाहेब शेवाळे
2.गाव – पिळकोस गट नं. गट नं. 346/2 पै क्षेत्र 0.6750 हे. आर पो.ख 0.30 हे. आर एकूण 0.9750 हे. आर आकार 0.75 रु. पै दिशा दक्षिण कब्जेदार सदरी दाखल करावयाचे नाव - आशाबाई अरुण शेवाळे
तसेच गट नं 346/2 पै. वाटप केलेल्या क्षेत्राच्या दोन्ही पट्टयाच्या मधल्या बांधावर एक विहीर असुन तीवर 5 हॉर्स पॉवर इले. मोटार, इले. कनेक्शन, कोटेशन, 500 फुट पाईप लाईन आहे. त्या विहिरीत, पाण्यात इले. मोटार. इले. कनेक्शन, कोटेशन, पाईप लाईन, पाईप पंप यात रेखा भाऊसाहेब शेवाळे यांचा 50 पैसे हक्क व आशाबाई अरुण शेवाळे यांचा 50 पैसे हक्क राहील. तसेच सदर विहिरीचा व त्यावरील इले. मोटार, इले. कनेक्शन, कोटेशन, पाईप लाईन दुरुस्ती व इलं. बिलाचा खर्च हा निम्मोनिम करणेचा आहे
आदेशातील अटी व शती-
1. सदर मिळकत ही अर्जदाराची वडीलोपार्जित मिळकत आहे. किंवा सदर मिळकत ही अर्जदारांची स्वकष्टार्जित मिळकत असुन अर्जदाराने ती शपथपत्रान्वये एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत सामिल केली आहे.
2. सदर वाटपास सर्व सहधारकांची संमती आहे. सदर वाटपाबाबत कोणाचीही हरकत नाही.
3. सदरचे वाटप हे सरस-निरस वहिवाटीप्रमाणे आहे.
4. प्रस्तुत वाटपामुळे मुंबईच्या जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 च्या तरतुदर्दोचा भंग झालेला नाही
5. प्रस्तुत विभाजन कोणत्याही कायदयातुन पळवाट काढण्यासाठी करण्यांत आलेले नाही.
6. सदर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत नाही.
7. सदर विभाजनामुळे अंमलात असलेल्या कोणत्याही कायदयांचा भंग झालेला नाही.
8. सदर मिळकतीबाबत कोणत्याही न्यायालयात कोणताही वाद / दावा प्रलंबित नाही किंवा मनाई हुकुम नाही असल्यास न्यायालयाचा निर्णय सर्व सबंधीतावर बंधनकारक असेल.
9. जमीनीचे वाटप आहे त्याच शर्तीवर करण्यांत आले आहे.
10. वाटपात असलेल्या जमीनीवर इतर हक्कामध्ये असलेले बोजे / शेरे कायम ठेवून वाटपास परवानगी दिली आहे.
11. विस्थापित खातेफोडीमुळे भूमिहीन/अल्पभुधारक/अत्यल्पभुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेणार नाही.
12. सदर विभाजनाच्या परवानगीमुळे भविष्यात काही वाद उदभवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत खातेदारांवर राहील.
13. विभाजनातील शेतजमिनीच्या मूळ अटी व शर्तीना बाधा पोहोचता कामा नये.
14. सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज काढले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधीतांची राहील.
15. सदर वाटप करतांना कोणतीही बाब जाणून बुजून लपविल्याचे उघड झाल्यास हा आदेश रद्द करण्यांत येईल.
म. तहसीलदार सो कळवण यांचे कडील आदेश क्रमांक वाटप एस. आर/ 65/2026 कळवण दि. 26/10/2026 अन्वये नोंद केली आहे.