Ferfar #1032 · साल्हेर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-13
- Objection until
- 2026-08-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 689/अ/पै/3
- Talathi
- रोहन भास्कर झिरवाळ
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026
मौजे साल्हेर तालुका बागलाण जि. नाशिक येथील ग.नं 689/अ/पै/3 क्षेत्र 1 हे. 61.49 आर., आकार 0.16 रु. या मिळकतीवर अधिकार अभिलेखात दि. 04/11/2022 रोजी नोंद क्र. 882 घेण्यात आली. यानुसार अर्जदार श्री. किसन धनजी सोनवणे यांचेकडील अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, मा. दिवाणी न्यायालय क.स्तर सटाणा यांचेकडील वारस दाखला (Legal Heirs-ship Application No 28/2020 dated 01/02/2021) यावरून मयत कै. धनजी लोटन सोनवणे यांचे नावे असलेला गट क्र. 689/अ/पै/3 वर एकमेव वारस म्हणून श्री. किसन धनजी सोनवणे नाव दाखल केले.
मौजे साल्हेर, ता. बागलाण महसुल दप्तरी झालेल्या फेरफार नोंद नं. 882 ला अर्जदार सुशीला धनजी सोनवणे व इतर कायदेशीर वारसांनी श्री. किसन धनजी सोनवणे यांचेविरूद्ध मा. उपविभागीय अधिकारी सो., बागलाण यांचे न्यायालयात आर.टी.एस. अपील नं.21/2026 अन्वये अपील दाखल केले होते. सदरचे अपीलामध्ये न्याय व गुणवत्तेवर सुनावणी घेवून मा. उपविभागीय अधिकारी सो., बागलाण यांनी सदर प्रकरणी दि. 27/05/2026 रोजी आर.टी.एस. प्रकरण क्र. 21/2026 आदेश पारीत केला. यानुसार अपीलकर्ता यांचा अपील अर्ज विवेचनात नमूद कारणास्तव अंशतः मंजूर करण्यात आला असून अर्जदार यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे आवश्यकतेनुसार वारसांची नावे दाखल करण्यासंदर्भात रितसर अर्ज करावा असे आदेशित केले आहे. तसेच संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतुदींनुसार योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा असे आदेशित केले आहे.
वरील आदेशास अनुसरून अर्जदार श्रीमती. सुशीला धनजी सोनवणे यांनी दिनांक 02/06/2026 रोजी ग्राम महसूल अधिकारी साल्हेर यांच्याकडे वारसांची नावे दाखल करण्यासंदर्भात रितसर अर्ज केला. कै. धनजी लोटन सोनवणे हे दि. 23/06/2016 रोजी मौजे साळवण ता. बागलाण जिल्हा नाशिक येथे मयत झालेले आहे. मौजे साळवण येथील स्थानिक वारस पंचनामा नुसार कै. धनजी लोटन सोनवणे यांना तीन पत्नी होत्या. त्यांची नावे व त्यांच्यापासून झालेली अपत्य खालीप्रमाणे
1)पहिली पत्नी नबाबाई धनजी सोनवणे, यांना एकूण मुले –1 मुली- 0, नामे 1) किसन धनजी सोनवणे
2)दुसरी पत्नी सिताबाई धनजी सोनवणे, यांना एकूण मुले 3, मुली 1. नामे 1) नानाजी धनजी सोनवणे,
2) साहेबराव धनजी सोनवणे, 3)चिंतामण धनजी सोनवणे आणि मुलगी नामे 1) आक्काबाई धनजी सोनवणे
3)तिसरी पत्नी सुशीला धनजी सोनवणे यांना मुले-0, मुली-0
असे एकूण पत्नी 03 पैकी 02 मयत, मुले- 04, मुली- 01 असे एकूण 6 कायदेशीर वारस आहेत. अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यू प्रमाणपत्र, स्थानिक वारस पंचनामा, मा. दिवाणी न्यायालय क.स्तर सटाणा यांचेकडील वारस दाखला (Legal Heirs-ship Application No 28/2020 dated 01/02/2021), मा. दिवाणी न्यायालय क.स्तर सटाणा यांचेकडील वारस दाखला (Legal Heirs-ship Application No 02/2022 dated 14/02/2023), मा. उपविभागीय अधिकारी सो., बागलाण यांचेकडील आदेश क्रमांक आर.टी.एस. प्रकरण क्र. 21/2026 दि. 27/05/2026 वरून नोंद केली असे.