Ferfar #3516 · चौगाव
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 555/1
- Talathi
- मनिषा भाउसाहेब पवार
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 170/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
वाटपाने – बाजुस दाखल ग.न. ग.न.555/1 चे मालक योगेश सुरेश शेवाळे व किरण सुरेश शेवाळे रा.चौगाव ता.बागलाण ,नाशिक यांनी त्यांच्या मालकीच्या कब्जातील जमीन/शेत जमिनीची वाटणी होऊन मिळावी म्हणुन केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार बागलाण यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 व त्याखालील महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमिनीचा विभाजन) नियम 1967 मधील नियम 3 अन्वये अर्जदार यांनी धारण केलेल्या उक्त जमिनीची खालीलप्रमाणे विभागणी/वाटणी करण्यास परवानगी देत आहे.
अ.न. ग.न. क्षेत्र पो.ख. आकार वाटपधारकाचे नाव
1) 555/1 0.98 0.0 1.83 सुवर्णा योगेश शेवाळे व
किरण सुरेश शेवाळे
वरील आदेशातील अटी व शर्ती
1) जमिनीचीशर्त जमिनीची विभागणी केले नंतर कायम राहील.
2) विभागणी पूर्वीचे जमिनीची असलेल्या रस्त्याची अगर पाण्याची वहिवाट कायम राहील.
3) सदर विभागणीचे कामे दिवाणी कोर्टात अगर महसूल न्यायालयात खटला सुरू असल्यास परवानगी रद्द करण्यात येईल.
4) या आदेशानंतर संबंधित खातेदार/खातेदारांनी मोजणी पोटहिस्सा फी भरून शेतात बांध घालावे.
5) इतर हक्कातील बोजे कायम ठेवावेत.
6) तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या भंग होणार नाही या शर्तीवर अनुसरून.
7) सदर वाटपामध्ये अर्जदार यांनी वारस सादर न केल्यास किंवा वारसा बाबत खोटी माहिती दिल्यास सदरील परवानगी रद्द करण्यात येईल.
8) अन्य प्रचलित कायद्यानुसार जी-जी परवानगी घेणे आवश्यक असेल ती-ती परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.आदेशान्वये नोंद केली असे.