Ferfar #7675 · वडेल
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1105/3
- Talathi
- शमिनाबानो अन्वर पिंजारी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा.अपर जिल्हाधिकारी कार्यालय,मालेगाव.जा.क्र.न.अ.श./भोग-1/एस.आर/63/2026 मालेगाव.दिनांक-28/09/2026. मौजे वडेल ता.मालेगाव येथील गट नं.1105/3 चे क्षेत्र 0.74 आर,पोख.0.02 आर,आकार 0.92 हे भोग वर्ग-२ ची मिळकत भोग वर्ग-१ करणेबाबत मा.अपर जिल्हाधिकारी कार्यालय,मालेगाव.जा. क्र.न.अ.श./भोग-1/एसआर/63/2026 मालेगाव.दिनांक.28/09/2026.यांचेकडील आदेशावरोन भोग वर्ग-२ ऐवजी भोग वर्ग-१ करण्यात आला आहे.अर्जदार श्री.रविंद्र सुरीतराम शेलार व इतर रा.वडेल ता.मालेगाव यांचे नावे असलेले स्वतंत्र आणेवारी लागवडीलायक क्षेत्र 0.74 आर,पोख.0.02 आर,आकार 0.92 हि मिळकत भोगवटदार वर्ग-२ मधून भोगवटदार-१ मध्ये रुपांतर आदेशातील अ.न १ ते ११ सह अटी व शर्तीस अधीन राहून भोगवटदार वर्ग-२ चे भोगवटदार-१ करण्यात येत आहे. आदेशातील अटी व शर्ती खालीलप्रमाणे.
1. उक्त आदेशानंतर जमीन मालक श्री.रविंद्र सुरीतराम शेलार व इतर रा.वडेल ता.मालेगांव जि. नाशिक हे मौजे वडेल ता.मालेगांव येथील अर्ज मिळकत भोगवटादार वर्ग 1 धारणाधिकारावर कृषि प्रयोजनार्थ धारण करतील.
2. विषयांकीत जमीनीचा अकृषिक प्रयोजनासाठी वापर करावयाचा झाल्यास, सक्षम अधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल व अशी परवानगी देत असताना नियमानुसार येणारी अधिमूल्यांची रक्कम शासनास अदा करणे जमीन धारक यांना बंधनकारक राहील.
3. प्रस्तूत जमीनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरण झाल्यावर महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 व महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाहण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबावत अधिनियम, 1947 मधील तरतुदीचा भंग होणार नाही याची तहसिलदार यांनी दक्षता घ्यावी.
4.विषयांकीत जमीनीच्या रुपांतर अधिमूल्य आकारणीच्या रामेषाषत भविष्यात लेखापरीक्षणात तफावत आढळून आल्यास येणारी फरकाची रक्कम शासनजमा करणे जमीन मालक यांना बंधकारक राहील. सदर रक्कम न भरल्यास जमीन महसुलाची थकबाकी म्हणून सक्तीने वसूल करण्यात येईन,
5. संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रस्तुत शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावर भूधारणा पध्दती भोगवटादर वर्ग 1 व इतर अधिकारात अशी नोंद घेण्यात यावी.
6. अर्जदार यांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले सर्व कागदपत्रे सत्य आहेत असे गृहीत धरुन सदर नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेली शेतजमीन भोवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये कृषिक प्रयोजनासाठी रुपांतरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. भविष्यात यात कोणतीही असत्यता आढळल्यास किंवा मालकी हक्काबाबत विवाद निर्माण झाल्यास ती निराकरण करण्याची जबाबदारी अर्जदार (जमीन मालक) यांची राहील.
7. प्रस्तुत जमीनीची रीतसर मोजणी करुन घेऊन 7/12 उतारा स्वतंत्र करण्याची व निघाल्यास जमीन महसूलाची थकबाकी शासनजमा करण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहील.
8. अर्ज मिळकतीच्या मालकी अथवा हस्तांतरण हक्काबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचे वाद प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडून पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीच्या हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहतील.
9. अधिकार अभिलेख व जमीनीच्या मालकी हक्काबाबत व इतर हक्कांबाबत भविष्यात काही बाद उद्भणवल्यास व त्यामध्ये काही तथ्य आढळल्यास तसेच मालकी हक्काबाबत काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास किंवा सदर मिळकतीबाबत न्यायालयाचे काही निर्णय झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांची राहील.
10. अर्जदार यांनी सादर केलेलो कागदपत्रे खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास तसेच मिळकतीच्या क्षेत्राबाबत तफावत आढळून आल्यास अगर प्रचलित कायदा व नियमांचा भंग झाल्यास व चौकशी अंती सत्यता आढळुन आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.
11. या आदेशातील कोणत्याही शर्त अगर अटीचा भंग झाल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.
वरीलप्रमाणे अटी व शर्तीस अधिन राहून भोगवटदार वर्ग-२ या धारणा प्रकारामधून भोगवटदार-१ या धारणा प्रकारामध्ये रुपांतर केले असे.गावी मा.अपर जिल्हाधिकारी कार्यालय,मालेगाव.जा.क्र.न.अ.श./भोग-1/एस.आर/63/2026 मालेगाव.दिनांक-28/09/2026.वरोन नोंद केली असे.