Ferfar #5119 · करंजगव्हाण
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/ब
- Talathi
- संतोष कडूसिंग गुसिंगे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार मालेगाव
आदेश क्रमांक :जमा-1/कावि/177/2026
आदेश दिनांक : 22/09/2026
सोबतच्या आदेशानुसार मौजे करंजगव्हाण येथील अर्जदार श्री विश्राम भावडू ह्याळीज यांच्या दि 05/05/2026 च्या अर्जानुसार गट नं 169/ब चे सातबारा उतारावरील इतर अधिक्रातील नावे कब्जेदार सदरी घेणे बाबत इकडील कार्यालात विनंती आर्ज सादर केल्याने प्रस्तुत प्रकरणे मंडळ अधिकारी करंजगव्हाण यांचा अहवाल व अर्जदार यानी अर्जा सोबत सादर केलेले कागदपत्राचे अवलोकन केले व या कार्यालयाकडून नोटीस काढून दि.20/08/2026 रोजी खुलासा सादर केलेला आहे तसेच तत्कालीन तलाठी यांनी सदर नोंदीचा अंमल घेताना पूर्वीच्या जुन्या प्रथेनुसार फक्त मुलांचे नाव कब्जेदार सदरी घेऊन मुलीचे नाव इतर अधिकारात दाखल केल्यामुळे इतर अधिकाराचे नावे कब्जेदार सदरी घेणे बाबत दि.19 मार्च 1998 मधील सूचनाप्रमाणे हिंदू वारसा कायदा 1956 अनुसार व तरतुदीनुसार वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडिलांचे निधनानंतर मुलीना समान हक्क होत असल्यामुळे वारस नोंद घेताना महिला वारसांची नावे इतर अधिकारात न घेता भोगवटदार सदरी घेणे आवश्यक आहे तसेच प्रस्तुत प्रकरणे मंडळ अधिकारी करंजगव्हाण यांचा अहवाल व अर्जदार यानी अर्जा सोबत सादर केलेले कागदपत्राचे अवलोकन केले असता मी.तहसीलदार मालेगाव अटी व शर्तीच्या अधीन राहून आदेश पारित करीत आहे,आदेश क्र जमा-1/कावि/177/2026 मालेगाव दि.22/09/2026 नुसार खालील अटी व शर्ती वरून आदेश पारित केल्याने सातबारा सदरी नोंद केली असे
अटी व शर्ती 1)मंडळ अधिकारी करंजगव्हाण यांचा अहवाल व अर्जदार यानी अर्जा सोबत सादर केलेले कागत पत्र यांच्या आधारे पारित केलेला आदेश 2)भविष्यात काही तक्रारी अथवा न्यायलईन हरकत ,तक्रार दाखल केल्यास सर्व हितसंबंधीताना बंधनकारक राहील.
3)अदेशासोबत संबंधित सहधारकांना हरकत असल्यास आदेशाच्या तारखेपासून 60 दिवसाच्या आत मा.उपविभागीय अधिकारी मालेगाव यांच्याकडे अपील दाखल करण्यात यावे.