Ferfar #4148 · पिंपळगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 295/2
- Talathi
- अनुप शशिकांत परदेशी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 239/2026
आदेश दिनांक : 09/10/2026
श्री. कोंडाजी राघो पवार व इतर 2 राह. जळगाव गा. ता. मालेगाव जि. नाशिक यांनी आपल्या नावावरील मौजे जळगाव गा. येथील गट नंबर 429 व मौजे पिंपळगाव येथील गट नंबर 295/2 हि जमीन आदेशातील नमूद अटी व शर्ती1 ते 10 यास अधीन राहून कुटुंबात खालील प्रमाणे वाटप करून घेतली.
१. जमिनीची शर्त जमीन विभागणी केल्यानंतर कायम राहतील.
२. इतर अधिकारातील सर्व नोंदी व बोजे कायम राहतील
३. विभागणीनंतर रस्त्याचा वापर सदर आदेशात नमूद केल्याप्रमाणे राहील,
४. सदर विभागणी पूर्वी दिवाणी कोर्टात अगर महसुल न्यायालयात खटला सुरु असल्यास वाटणी आदेश रद्द करण्यात येईल.
५. या आदेशानंतर संबंधित खातेदारांनी शेतात बांध घालावेत.
६. प्रमाणभूत क्षेत्रासोबत वाटणी घेणार यांचे क्षेत्र कमी असल्यास सदर गटाचे विभाजन न करता वाटणी घेणार यांची आणेवारी दाखल करावी.
७. पोट हिश्याची मोजणी फी वसूल करून घावी.
८. सदर जमिनीचे इतर हक्कातील असलेले बोजे / नोंदी सर्व वाटणीदारांची ७/१२ वर घेण्यात यावेत.
९. सदर आदेश अर्जदार/सहहिस्शेदार संमतीदार यांनी दिलेल्या अर्जावरून समक्ष घेण्यात आलेल्या जबाबावरून असून विलेल्या माहिती खोटी आढळल्यास सदरचे आदेश पूर्वलक्षी प्रभावाने रद्द समजण्यात येईल.
१०. सदर गट नं 429 मधील विहीर व तसेच बांधलेले घर यावर वरील दोघांचा समयाईक हक्क व अधिकार राहील, असे सर्वांना मान्य व कबूल आहे.
मौजे जळगाव गा. येथील गट नंबर 429 मधील वाटणी खालीलप्रमाणे
1)श्री सुनील कोंडाजी पवार यांचे वाटणीस आलेली मिळकत गट नंबर 429 यापैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0 हे. 50 आर पो. ख. 0 आर आकार 0 रु 71 पै.
2 ) श्री. कोंडाजी राघो पवार व गणेश कोंडाजी पवार यांचे सामाईक वाटणीस आलेली मिळकत गट नंबर 429 यापैकी पूर्वेकडील क्षेत्र 0 हे. 50 आर पो. ख. 00 आर आकार 0 रु 71 पै.
मौजे पिंपळगाव येथील गट नंबर 295/2 मधील वाटणी खालीलप्रमाणे
1)श्री सुनील कोंडाजी पवार यांचे वाटणीस आलेली मिळकत गट नंबर 295/2 यापैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0 हे. 47 आर पो. ख. 0 आर आकार 0 रु 55 पै.
2 ) श्री.गणेश कोंडाजी पवार यांचे वाटणीस आलेली मिळकत गट नंबर 295/2 यापैकी पूर्वेकडील क्षेत्र 0 हे.46 आर पो. ख. 01 आर आकार 0 रु 55 पै
वरील प्रमाणे वाटप करून घेतली. मा. तहसीलदार मालेगाव यांचे कडील आदेश क्र. जमीन/वाटणी/कावि/239 /2026 दि.09/10/2026 आलेवरून नोंद केली असे.