Ferfar #4140 · जळगांव (गा.)
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 297/2
- Talathi
- अनुप शशिकांत परदेशी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अर्जदार श्री. नेपालसिंग विजयसिंग ठाकुर यांनी मौजे जळगाव गा ता. मालेगाव येथील गट नं. 297/2 क्षेत्र 1.37 हे. आर. आकार 1.50 रु. पै. या मिळकतीवरील भोगवतदार 2 हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 1 करून मिळणे बाबत मा. तहसीलदार सो. मालेगाव यांचेकडे दि. 04/05/2026 रोजी अर्ज केलेप्रमाणे मा. तहसिलदार सो. मालेगाव यांनी जा.क्र.जमा-2/खंडकरी/कावि/505/2026 मालेगाव दि. 07/09/2026 प्रमाणे मौजे जळगाव गा ता.मालेगाव येथील गट नं. 297/2 क्षेत्र 1.37 हे. आर. आकार 1.50 रु. पै. या मिळकतीवरील भोगवटादार 2 हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 1 करणेबाबत दि.18/8/2026 ला 281809/- (अ-दोन लाख ऐक्याऐंशी हजार आठशे नऊ) हे MH008501010202627M प्रमाणे भरणा करुन 1 ते 10 अटी व शर्ती च्या अधीन राहून आदेश पारित केला असे.
अटी व शर्ती –
1. सदर मिळकती बाबत कोणताही वाद सुरू अथवा प्रलंबित असल्यास तसेच मिळकती बाबत भविष्यात वाद उपस्थित झाल्यास त्यास अर्जदार सर्वस्वी जबाबदार राहील.
2. सदर मिळकतीच्या इतर हक्कात कोणतेही वित्तीय बोजे असल्यास त्यास अधिन राहून सदरचा आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
3. सदरचा आदेश हा अर्ज मिळकत फक्त भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणे बाबत लागु आहेत. सदरच्या आदेशाने अर्ज मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तांतरण व मालकी हक्क ठरविला जात नाही.
4. अर्ज मिळकतीच्या मालकी अथवा हस्तांतरण हक्काबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचे वाद प्रलंबित असल्यास सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालय होणारे यांचे सर्व आदेश अर्ज मिळकतीच्या हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहतील व अर्ज मिळकतीच्या हस्तांतरणासाठी संबंधित न्यायालय यांची परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
5. प्रश्नांकीत मिळकतीवर बांधकाम करण्यापूर्वी तसेच वापरात बदल करण्यापूर्वी सक्षम प्राधिकारी यांचेकडुन अभिन्यास मंजूर करून घेऊनच बांधकाम करणे बंधनकारक राहील.
6. भविष्यात लेखापरिक्षणात नजराणा रक्कम कमी भरणा झाला असले बाबत शक निघाल्यास सदरची रक्कम भरणे करणे बाबतची जबाबदारी अर्जदार यांची राहील.
7. प्रश्नाधिन मिळकतीबाबत अर्जदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती सादर केल्याचे आढळून आल्यास सदरचा आदेश रह होण्यास पात्र राहील.
8. या आदेशातील कोणत्याही शर्त अगर अर्टीचा भंग झाल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.
10. अर्जदार यांनी प्रकरणी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत अथवा चुकीची माहिती आढळून
आल्यास सदरचे आदेश रह करण्यात येईल.
मा. तहसिलदार सो. मालेगाव यांचेकडील प्राप्त आदेश क्र. जा.क्र.जमा-2/खंडकरी/कावि/505/2026 मालेगाव दि. 07/09/2026 हा शेरा कमी करून 7/12 उताऱ्यावरील भूधारणा प्रकार भोगवटादार 2 वरुन भोगवटादार वर्ग 1 केला असे. आदेशवरून नोंद केली असे.