सातबारा Watch

← दाभाडी

Ferfar #28685 · दाभाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
698/1/1/698/1/2/109
Talathi
मोहन युवराज वाजे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 संदर्भ :- अवसायक व्ही. एस. पानपाटील पदमिनी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दाभाडी तथा अपर उप लेखापरिक्षक सह संस्था मालेगाव यांच्याकडील पत्र दिनांक 23/05/2025 मौजे दाभाडी शिवार येथील सर्वे नं. 698/1/1+698/1/2 चे प्लॉट क्र.25 ते 42 व 92 ते 122 या मिळकतीवर बांधण्यात आलेली, पदमिनी सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्यादित दाभाडी ता. मालेगांव जि. नाशिक, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 अन्वये दि. 12/06/2018 पासुन अवसायनात घेण्यात आलेली असुन, सदर संस्थेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 103 (4) प्रमाणे उपनिबंधक, सहकारी संस्था, मालेगाव ता. मालेगाव, जि. नाशिक यांचेकडील आदेश क्र. जा.क्र.वि.-5/अव. बदल आदेश/क.103(4)/सन 2021 अन्वये अवासायक म्हणुन व्ही. एस. पानपाटील, अपर उप लेखापरिक्षक सह संस्था पदमिनी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दाभाडी, ता. मालेगाव यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. सदर संस्था अवसायनात असल्यामुळे संस्थेचे दप्तर व मालमत्ता ही अवसायक यांचे नियंत्रणाखाली आहे. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये अवसायक व्ही. एस. पानपाटील, अपर उप लेखापरिक्षक सह संस्था पदमिनी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक यांनी मौजे दाभाडी येथील ग.नं./स.नं.698/1/1+698/1/2 चे प्लॉट क्र. 25 ते 42 व 92 ते 122 पैकी प्लॉट नं 109 पैकी (क्षेत्र 81.00 चौ. मी. वर बांधण्यात आलेला रो हाऊस क्र ए-30) हा संस्थेचे सभासद श्री. प्रकाश नानाजी देवरे यांचे मालकीचा असून त्यांना वाटप केलेला आहे. त्यावर संस्थेमार्फत सहकार, पणन व वस्त्रो‌द्योग विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडून घेतलेल्या गृह कर्जाची व्याज व मुददलासह पुर्णता परतफेड केलेली आहे. तरी ग.नं./स.नं.698/1/1+698/1/2 चे प्लॉट क्र. 109 (क्षेत्र 81.00 चौ. मी.) या मिळकतीवर बांधण्यात आलेला रो हाऊस क्र ए-30 क्षेत्र 81.00 चौ. मी. वर दाखल अवसायक पदमिनी सहकारी संस्था मार्यादित दाभाडी ता. मालेगांव जि. नाशिक हे नाव कमी करून संस्थेचे सभासद श्री. प्रकाश नानाजी देवरे, यांचे मालकीचे (क्षेत्र 81.00 चौ. मी.) वर त्यांचे नाव दाखल करण्यात यावे बाबत अवसायक व्ही. एस. पानपाटील पदमिनी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दाभाडी तथा अपर उप लेखापरिक्षक सह संस्था मालेगाव यांच्याकडील पत्र दिनांक 23/05/2025, मा. तहसीलदार सो. मालेगाव, जि. नाशिक यांचेकडील पत्र क्र. जमा-1/कावि/889/2026 दिनांक 13/10/2026, अवसायन आदेशाची छायांकित प्रत, अलॉटमेंट पत्राची प्रत, ताबा पावती नोटरी, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, नादेय प्रमाणपत्र सादर केले असे. वरीलप्रमाणे अवसायक व्ही. एस. पानपाटील पदमिनी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दाभाडी तथा अपर उप लेखापरिक्षक सह संस्था मालेगाव यांच्याकडील पत्र दिनांक 23/05/2025, उपनिबंधक सहकारी संस्था, मालेगाव ता. मालेगाव, जि. नाशिक यांचेकडील आदेश क्र. जा.क्र.वि.-5/अव. बदल आदेश/क.103(4)/सन 2021 दि. 17/03/2021 ची प्रत तसेच मा. तहसीलदार सो. मालेगाव, जि. नाशिक यांचेकडील पत्र क्र. जमा-1/कावि/889/2026 दिनांक 13/10/2026 प्राप्त झाले वरून मौजे दाभाडी येथील गट नं 698/1/1+698/1/2 चे प्लॉट क्र.109 वर नोंद केली असे.