सातबारा Watch

← पारेकरवाडी

Ferfar #502 · पारेकरवाडी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
दर्शना विकास शेळके
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी – मा. उपविभागीय अधिकारी, येवला उपविभाग, येवला आदेश क्रमांक –क्र. अकृषिक/मौ.पारेकरवाडी/सनद रद्द/क्र./कावि/12/2026 आदेश दिनांक- 03/09/2026 मा. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक 31 डिसेंबर, 2025 अन्वये मा. महाराष्ट्र शासन, यांनी राजपत्राद्वारे जाहिर केले की, महाराष्ट्र जमिन महसुल संहिता, 1966 चे कलम 42 अ, 42 ब, 42 क, 42 ड, 44, 44 अ, 45 व 46 सदरचे कलम रद्द करणेत आलेले आहेत. आणि शासन परिपत्रक क्र.एनएपी-2021/प्र.क्र./प्र.क्र.118/ज-1 अ दिनांक 13/04/2022 अन्वये तहसिलदार नांदगांव यांनी मौजे पारेकरवाडी, ता. नांदगांव जि. नाशिक येथील गट नं. 17 यांसी क्षेत्र 04 हे. 08 आर (47500.00 चौ.मी.) या क्षेत्राची रहिवास या प्रयोजनासाठी महाराष्ट्र जमिन महसुल संहिता, 1966 चे कलम 42 ड अन्वये तहसिलदार नांदगांव यांचेकडील सनद जा. क्र.जमा-1/कावि/66/2026 दिनांक 31/01/2026 अन्वये सनद निर्गमित केलेली आहे. आणि , तहसिलदार नांदगांव यांचेकडील क्र. जमा-1/कावि/225/2026 दिनांक 23/06/2026 अन्वये तहसिलदार नांदगांव यांनी मौजे पारेकरवाडी, ता. नांदगांव येथील गट नं. 17 या मिळकतीची म.ज.म.अधिनियम, 1966 चे कलम 42 ड अन्वये पारित केलेली सनद रद्द करणे बाबतचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, येवला उपविभाग, येवला सादर केला आहे. आणि , मा. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक 31 डिसेंबर, 2025 नुसार जर म.ज.म. अधिनियम, 1966 चे कलम 42 ड हे वगळण्यात आलेले असतांना तहसिलदार नांदगांव यांचेकडील सनद जा. क्र.जमा-1/कावि/66/2026 दिनांक 31/01/2026अन्वये पारित करणेत आलेली सनद ही नियमबाह्य असल्याचे दिसुन येत आहे. त्याअर्थी, मा. उपविभागीय अधिकारी येवला यांनी खालील प्रमाणे आदेश पारित केला आहे. आदेश 1)मौजे पारेकरवाडी ता. नांदगांव जि. नाशिक येथील गट नं. 17 या मिळकतीचे एकुण क्षेत्र 04 हे. 75 आर, (47500.00 चौ.मी.) या क्षेत्राची तहसिलदार नांदगांव यांनी पारित केलेली महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम, 1966 अन्वये भोगवटादारास द्यावयाची सनद (अकृषिक वापराची परवानगी) जा.क्र.जमा-1/कावि/66/2026 दिनांक 30/01/2026 रद्द करणेत येत आहे. 2)तहसिलदार नांदगाव यांनी पारित केलेल्या सनद ( अकृषिक वापराची परवानगी ) अन्वये मौजे पारेकरवाडी ता. नांदगांव जि. नाशिक येथील गट नं. 17 या मिळकतीचे अधिकार अभिलेखातील घेण्यात आलेल्या नोंदी रद्द करण्यात याव्यात. व अधिकार अभिलेखात योग्य त्या नोंदी घेण्यात याव्यात. तहसिलदार नांदगांव यांचेकडील क्र. जमा-1/कावि/225/2026 दिनांक 23/06/2026 अन्वये घेण्यात आलेली फेरफार नोंद क्र 480 दि .6/3/2026 नोंद रद्द केली असून गट क्र. 17 वरील फेरफार नोंद क्र 480 च्या पूर्वीची स्थिती पूर्ववत केली असे. मा. उपविभागीय अधिकारी, येवला उपविभाग, येवला यांचाकडील आदेश क्रमांक क्र. अकृषिक/मौ.पारेकरवाडी/सनद रद्द/क्र./कावि/12/2026 –यानुसार नोंद घेण्यात आली आहे.