सातबारा Watch

← धोटाणे बु ।।

Ferfar #2033 · धोटाणे बु ।।

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
174/2
Talathi
दत्तात्रय गंगाधर वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस / ज.वि./ एसआर- 240/ 2026 आदेश दिनांक : 28/10/2026 आदेश बाजुस दाखल केलेल्या गट नंबरचे मालक श्री. भिमा नारायण कुणगर व बनाबाई सिताराम राजनोर व इतर 2 रा. धोटाणे बु. ता. नांदगाव यांनी त्यांचे नावावरील मौजे धोटाने बु ता. नांदगाव येथील गट नं. 174/2 या जमिनीचे मा. तहसीलदार साहेब नांदगाव यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जमिनीचे विभाजन नियन 1967 अंतर्गत जमीन वाटपासंबंधी लेखी अर्ज दिला असुन मा. तहसिलदार साहेब नांदगाव यांनी त्यांचे नांवावरील शेतजमीन त्यांचे कुटुंबामध्ये खालीलप्रमाणे विभाजन करण्यास परवानगी दिली. विभाजनाचा तपशील : 1) गाव :- धोटाने बु गट नं 174/2 क्षेत्र :- 0.48 हे.आर पो.ख. क्षेत्र :- 0.02 आकार :- 0.93 रु.पैसे दिशा :- उत्तर बाजूकडून नंबर 3 कब्जेदाराचे नाव :- भिमा नारायण कुणगर 2) गाव :- धोटाने बु गट नं 174/2 क्षेत्र :- 0.10 हे.आर पो.ख. क्षेत्र :- 0.00 आकार :- 0.19 रु.पैसे दिशा :- उत्तर बाजुकडून नंबर 1 पांझण नदीच्या बाजूने कब्जेदाराचे नाव :- रविंद्र सिताराम राजनोर व शारदा योगेश्वर राजनोर 3) गाव :- धोटाने बु गट नं 174/2 क्षेत्र :- 0.23 हे.आर पो.ख. क्षेत्र :- 0.02 आकार :- 0.45 रु.पैसे दिशा :- पूर्व दक्षिण कोपरा कब्जेदाराचे नाव :- रविंद्र सिताराम राजनोर 4) गाव :- धोटाने बु गट 174/2 क्षेत्र :- 0.24 हे.आर पो.ख. क्षेत्र :- 0.01 आकार :- 0.47 रु.पैसे दिशा :- पूर्व दक्षिण कोपरा कब्जेदाराचे नाव :- शारदा योगेश्वर राजनोर 5) गाव :- धोटाने बु गट 174/2 क्षेत्र :- 0.10 हे.आर पो.ख. क्षेत्र :- 0.00 आकार :- 0.20 रु.पैसे दिशा :- उत्तर बाजूकडून नंबर 2 कब्जेदाराचे नाव :- भिमा नारायण कुणगर टिप –1) सदर गट नं.174/2 मध्ये भिमा नारायण कुणगर यांचे हिश्यात एक विहीर असून सदर विहिरीत भिमा नारायण कुणगर यांचा 0.50 पैसे हिस्सा रविंद्र सिताराम राजनोर व शारदा योगेश्वर राजनोर यांचा प्रत्येकी 0.25 पैसे हिस्सा राहील. 2)सदर गट 174/2 च्या पूर्व बाजुच्या बांधाने उत्तर-दक्षिण असा 5 फुट रुंदीचा रस्ता सर्वाना जाणेयेणे करिता सामाईक वहिवाट वापराचा हक्क राहील. अटी व शर्ती:- 1. सदर जमिनीचे 7/12 वरील इतर हक्कातील शेरे / बोजे कायम ठेवावे. 2. सदर जमिनीचे नवीन पोट हिस्से करुन स्वतंत्र 7/12 वेगळा करु नये. 3. जमिनीची शर्त कायम राहिल. 4. सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत /बोजाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल. 5. वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा. 6. विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल. 7. वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेऊन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल. 8. सिलींग कायदयास बाधा येणार नाही, या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे. 9. खाते फोडीमुळे खातेदार भुमीहिन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही. 10. अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु.100/- च्या स्टॅपवर वाटपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल. 11. सदर विभाजनाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास / बोजाबाबत / जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल, तसेच मे. न्यायालयाचे आदेश सर्व हितसंबंधितावर बंधनकारक राहतील. 12. वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही. तहसिलदार सो नांदगाव यांचे कडील आदेश क्र.आरटीएस / ज.वि./ एसआर- 240/ 2026 नांदगाव दि 28/10/2026 च्या आदेशा वरोन अटी व शर्ती 1 ते 12 ला अधिन राहुन नोंद केली असे.