Ferfar #7042 · मांडवड
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
सक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक आदेश क्र.आरटीएस/अपील/96/2023 दिनांक 17/10/2024 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.
बंद केलेला स.नं. / गट नं. =247/1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आदेश :-
प्रस्तुत प्रकरणातील अर्जदारांचा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम २४७अन्वये दाखल अपील अर्ज, प्रतिवादी यांच्या युक्तीवादातील मुद्दे व प्रकरणात दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. त्यावरून पुढील निष्कर्ष निघतात ;
६.१ मौजे मांडवड, ता. नांदगाव, जि. नाशिक येथील गट नं. २४७ (जुना गट नं. ३९१) ही मिळकत श्री. रतन रावजी आहेर यांचे मुळ मालकीची होती. रतन रावजी आहेर हे मयत झाल्याने गावी फेरफार नोंद क्र. ६१३ ही वारस नोंद दाखल होऊन ती दि. २१/०६/१९८० रोजी प्रमाणित झाली. सदर नोंदीनुसार रतन रावजी आहेर यांचे वारस - मुले २, मुली ३ व पत्नी १ यांची नावे वादातील मिळकतीच्या अधिकार अभिलेखात दाखल झाली. तथापि, सदर नोंदीनुसार केवळ रतन आहेर, भाऊसाहेब रतन आहेर, कमलबाई रतन आहेर अ.पा.क. लक्ष्मीबाई रतन आहेर यांची नावे भोगवटादार सदरी दाखल होऊन दोन मुली - काशिबाई लक्ष्मण दवंगे व वत्सला उत्तमराव जाधव यांची नावे इतर अधिकार सदरी दाखल झाली.
६.२ त्यानंतर अर्जदार श्री. केवळ रतन आहेर यांनी गट नं. २४७ या मिळकतीचे वाटप करणेकामी तलाठी मांडवड यांचेकडे अर्ज सादर केल्यावरून वादातील मीळकतीच्या अधिकार अभिलेखात वाटपानी फेरफार नोर क्र. ३९४९ ही दि. २८/०२/२०१२ रोजी दाखल होऊन ती प्रमाणित झाली आहे. सदर नोंदीनुसार गट नं. २४७ या मिळकतीपैकी १ हे. ०४ आर क्षेत्र केवळ रतन आहेर व संदिप केवळ आहेर यांना, गट नं. २४७ पैकी १ हे. ०५ आर क्षेत्र विमलबाई केवळ आहेर यांना व गट नं. २४७ पैकी २ हे. ०९ आर क्षेत्र भाऊसाहेब रतन आहेर यांना वाटप करण्यात आले.
६.३ फेरफार नोंद क्र. ३९४९ विरूध्द प्रतिवादी क्र. १ यांनी उपविभागीय अधिकारी, येवला यांच्याकडे अपिल दाखल केले. उपविभागीय अधिकारी, येवला यांनी सदर अपिल दाखल करण्यास झालेला विलंब त्यांचेकडील दि. १४/१०/२०२२ रोजीच्या अंतरिम आदेशान्वये माफ करून अपिल दाखल करून घेतले. उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणीअंती सदर प्रकरणात दि. ०६/०९/२०२३ रोजी अंतिम आदेश पारित करून प्रतिवादी क्र. १ यांचा अपिल अर्ज मंजुर केला व फेरफार नोंद क्र. ३९४९ रद्द केली आहे.
६.४ वादातील मिळकत ही अर्जदार व प्रतिवादी यांची वडिलोपार्जित मिळकत असुन अर्जदार श्री. केवळ रतन आहेर, प्रतिवादी क्र. १ सौ. कमल रमेश सोमवंशी, प्रतिवादी क्र. २ श्री. भाऊसाहेब रतन आहेर तसेच काशिबाई लक्ष्मण दवंगे व वत्सला उत्तमराव जाधव हे रतन रावजी आहेर व लक्ष्मीबाई रतन आहेर यांचे कायदेशीर वारस आहेत. अर्जदारांनीदेखील सदर बाब मान्य केली आहे. फेरफार नोंद क्र. ६१३ नुसार वादातील मिळकतीच्या भोगवटादार सदरी केवळ रतन आहेर, भाऊसाहेब रतन आहेर, कमलबाई रतन आहेर अ.पा.क. लक्ष्मीबाई रतन आहेर यांची नावे व इतर अधिकार सदरी काशिबाई लक्ष्मण दबंगे व वत्सला उत्तमराव जाधव यांची नावे दाखल असतांना अर्जदार श्री. केवळ रतन आहेर यांनी वादातील मिळकतीचे स्वत, त्यांचा मुलगा -संदिप केवळ आहेर, त्यांची पत्नी विमलबाई केवळ आहेर व त्यांचा भाऊ प्रतिवादी क्र. २ भाऊसाहेब रतन आहेर यांचेमध्ये फेरफार नोंद क्र. ३९४९ नुसार वाटप करून घेतले आहे.
६.५ प्रतिवादी क्र. १, कमल रमेश सोमवंशी, काशिबाई लक्ष्मण दवंगे व वत्सला उत्तमराव जाधव हे देखील मयत रतन रावजी आहेर व लक्ष्मीबाई रतन आहेर यांचे हिंदू वारस कायद्यातील तरतुदीनुसार वर्ग १ चे कायदेशीर वारस असल्याने त्यांचा वादातील मिळकतीमध्ये कायदेशीर वारसा हक्क अबाधित आहे. त्यामुळे वादातील मिळकती या फेरफार नोंद क्र. ३९४९ अन्वये वाटप करून घेतांना सदर कायदेशीर वारसांचा वादातील मिळकतीमधील हक्क डावलण्यात आल्याचे दिसुन येते.
६.६ अधिकार अभिलेखात नाव असलेली व्यक्ती मयत झाल्यानंतर सदर व्यक्तीच्या सर्व कायदेशीर वारसांची नोंद अधिकार अभिलेखात घेणे अनिवार्य आहे. त्यामध्ये वारसांचा परस्पर हक्क निश्चित करण्याचा किंवा वाटणीचा कोणताही संबंध येत नाही. मयत खातेदाराच्या कायदेशीर वारसांची नोंद झाल्यानंतर सदर वारसांनी आपापसातील वाटणी बाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे. प्रस्तुत प्रकरणात वादातील मिळकतीचे मूळ मालक रतन रावनी आहेर यांचे कायदेशीर वारसांना म्हणजेच मुलीना डावलून अर्जदार व प्रतिवादी क्र. २ यांनी वादातील मिळकत बेकायदेशीर रितीने आपापसात वाटप करून घेतल्याची बाब स्पष्ट होते.
तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांनी वाटपाची नोंद दाखल करणेपुर्वी मुळ खातेदारांची वारस चौकशी करणे ही कायदेशीर अशी बाब आहे. तथापि, अशी कुठलीही कार्यवाही न करता मुळ वारसांचा हक्क डावलून अर्जदार यांचे वारस व प्रतिवादी क्र. २ यांचे नावे वाटप करणे ही बाब बेकायदेशीर व नियमबाह्य अशी आहे. तसेच वादातील मिळकतीच्या वाटपाबाबत महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम, १९६६ चे कलम ८५ मधील तरतुदीनुसार तहसिलदार यांचेकडील आदेश देखील नाहीत.
६.८ सदर वाटपाबाबत मयत केवळ रतन आहेर यांच्या मुली प्रतिवादी क्र. १, कमल रमेश सोमवंशी, काशिबाई लक्ष्मण दवंगे व वत्सला उत्तमराव जाधव यांची संमती असल्याचे किंवा त्यांनी त्यांचा हक्क सोडल्याचे दिसून येत नाही, सदर वाटपाबाबत त्यांना कळविण्यात आल्याचे देखील दिसून येत नाही. यावरून सदर वाटप करतांना वादातील मिळकतीमधील त्यांचा हक्क डावलण्यात आल्याची बाब प्रकरणात स्पष्ट होते. त्यामुळे फेरफार नोंद क्र. ३९४९ ही चुकीची व बेकायदेशीर असल्याने रद्द होण्यास पात्र आहे.
६.९ तसेच कै.. रतन रावजी आहेर व कै, लक्ष्मीबाई रतन आहेर हे मयत असल्यामुळे त्यांची वारस चौकशी करण्यात येऊन त्यांचे सर्व कायदेशीर वारसांची नावे वादातील मिळकतीच्या अधिकार अभिलेखात दाखल होणे आवश्यक आहे.
उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता उपविभागीय अधिकारी, येवला यांचा फेरफार नोंद क्र. ३९४९ रद्द करणेबाबतचा निर्णय योग्य व कायदेशीर असल्याने, त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.
आदेश
१. अपील फेटाळण्यात येत आहे.
२. उपविभागीय अधिकारी, येवला यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/अपील/१८८/२०२१. दि. ०६/०९/२०२३ कायम करण्यात येत आहे.
मा.अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांचे कडील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/96/2023 दिनांक 17/10/2024 आदेशांवरोन नोंद केली असे.