सातबारा Watch

← बाणगाव बु.।।

Ferfar #2010 · बाणगाव बु.।।

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
259/3, 260/5
Talathi
शरीफगनीशेख
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 195/2026 नांदगाव आदेश दिनांक : 08/09/2026 आदेश :- अर्जदार सुमनबाई रामदास परदेशी व इतर रा. मल्हारवाडी ता.नांदगाव जि.नाशिक येथील जमिनीचे विभाजन परवानगी मिळणेकामी मौजे बाणगाव बु. ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं.259/3 , 260/5 ह्या जमिनीचे विभाजनाबाबत अर्ज केला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 नुसार खालील प्रमाणे विभाजन केले असे. 1) ग.नं. 259/3 , क्षेत्र 0 हे. 41 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 0 रु 50 पैसे, दिशा पूर्वेकडून उत्तर-दक्षिण क्षेत्र विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- राजश्री राजेंद्र परदेशी, सुरज राजेंद्र परदेशी, धिरज राजेंद्र परदेशी 2) ग.नं. 259/3 क्षेत्र 0 हे. 40 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 0 रु 50 पैसे, मध्यभागातील उत्तर-दक्षिण क्षेत्र विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- कल्पना शंकर परदेशी, ओम शंकर परदेशी, प्रिती कल्पेश बेलदार, पायल गौरव बहादपुरे 3) ग.नं. 259/3 क्षेत्र 0 हे. 40 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 0 रु 50 पैसे, दिशा पश्चिमेकडून उत्तर –दक्षिण क्षेत्र विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- सोनाली संतोष परदेशी, यश संतोष परदेशी अ.पा.क. सोनाली संतोष परदेशी, अंजली संतोष परदेशी अ.पा.क.सोनाली संतोष परदेशी 4) ग.नं. 260/5 क्षेत्र 0 हे. 37 आर, पो.ख. 0 हे 02 आर, आकार 0 रु 29 पैसे, दिशा पश्चिमेकडील उत्तर- दक्षिण क्षेत्र विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- राजश्री राजेंद्र परदेशी 5) ग.नं. 260/5 क्षेत्र 0 हे. 30 आर, पो.ख. 0 हे 01 आर, आकार 0 रु 23 पैसे, दिशा पूर्वेकडील उत्तर –पूर्व कोपऱ्यातील क्षेत्र विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- राजश्री राजेंद्र परदेशी, सुरज राजेंद्र परदेशी, धिरज राजेंद्र परदेशी 6) ग.नं. 260/5 क्षेत्र 0 हे. 31 आर, पो.ख. 0 हे 01 आर, आकार 0 रु 25 पैसे, दिशा पूर्वेकडील मध्य-भागातील पूर्व-पश्चिम क्षेत्र विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- कल्पना शंकर परदेशी, ओम शंकर परदेशी, प्रिती कल्पेश बेलदार, पायल गौरव बहादरपुरे 7) ग.नं. 260/5 क्षेत्र 0 हे. 30 आर, पो.ख. 0 हे 01 आर, आकार 0 रु 23 पैसे, दिशा पूर्वेकडील दक्षिण –पूर्व कोपऱ्यातील क्षेत्र विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- सोनाली संतोष परदेशी, यश संतोष परदेशी अ.पा.क. सोनाली संतोष परदेशी, अंजली संतोष परदेशी अ.पा.क.सोनाली संतोष परदेशी पाणी हक्क:- वर कलम 1 क मध्ये वर्णन केलेल्या मौजे बाणगांव बु. गट नं. 259/3 यांतील खाते क्र. 268 अन्वये असलेल्या एकुण क्षेत्र 1 हे. 21.00 आर या क्षेत्रांत विहीर असून सदरहू विहीरीत अ.नं.2 ते 4 नामे अनुक्रमे राजश्री राजेंद्र परदेशी, सुरज राजेंद्र परदेशी व धिरज राजेंद्र परदेशी यांचा 0 रू 34 पैसे पाणी हिस्सा राहील तसेच प्र.क.नं.5 ते 8 नामे अनुक्रमे कल्पना शंकर परदेशी, ओम शंकर परदेशी, प्रिती कल्पेश बेलदार व पायल गौरव बहादरपुरे यांचा 0 रू 33 पैसे पाणी हिस्सा राहील तसेच अ.नं. 9 ते 11 नामे अनुक्रमे सोनाली संतोष परदेशी, यश संतोष परदेशी अ.पा.क. सोनाली संतोष परदेशी व अंजली संतोष परदेशी अ.पा.क. सोनाली संतोष परदेशी यांचा 0 रु 33 पैसे पाणी हिस्सा राहील. वहिवाट हक्क :- वर कलम 1क मध्ये वर्णन केलेल्या मौजे बाणगांव बु. येथील गट नं. 259/3 यांतील खाते क्र. 268 अन्वये असलेल्या मिळकत क्षेत्रापैकी वाटपधारक अ.नं.2 ते 4 नामे अनुक्रमे राजश्री राजेंद्र परदेशी, सुरज राजेंद्र परदेशी व धिरज राजेंद्र परदेशी यांच्या वाटप क्षेत्रांच्या तसेच अ.नं.5 ते 8 नामे अनुक्रमे कल्पना शंकर परदेशी, ओम शंकर परदेशी, प्रिती कल्पेश बेलदार व पायल गौरव बहादरपुरे यांच्या वाटप क्षेत्रांच्या तसेच अ.नं.9 ते 11 नामे अनुक्रमे सोनाली संतोष परदेशी, यश संतोष परदेशी अ.पा.क. सोनाली संतोष परदेशी व अंजली संतोष परदेशी अ.पा.क. सोनाली संतोष परदेशी यांच्या वाटप क्षेत्राच्या या तिनही वाटप क्षेत्रांच्या उत्तर बाजुलगत सामाईक वहिवाटी वापराचा रस्ता रस्ता असून सदरचा वहिवाटी वापर रस्ता हा ज्या त्या वाटप मिळकतींस मिळकतींच्या वाटप धारकांना वाटप मिळकतींस वापर करणेकामी आहे व राहील. वर कलम 1ड मध्ये वर्णन केलेल्या मौजे बाणगांव बु. येथील गट नं. 260/5 या संपुर्ण गटाच्या दक्षिण बाजुलगत व पुर्व बाजुलगत पुर्वापार वहिवाटी वापर रस्ता असून अ.नं.2 राजश्री राजेंद्र परदेशी यांच्या वाटपक्षेत्रास दक्षिण बाजुलगत पुर्वापार वहिवाटी वापर रस्ता असून अ.नं.2 ते 4 नामे अनुक्रमे राजश्री राजेंद्र परदेशी, सुरज राजेंद्र परदेशी व धिरज राजेंद्र परदेशी यांच्या वाटप क्षेत्नांस पुर्व बाजुलगत पुर्वापार वहिवाटी वापर रस्ता असून तसेच अ.नं.5 ते 8 नामे अनुक्रमे कल्पना शंकर परदेशी, ओम शंकर परदेशी, प्रिती कल्पेश बेलदार व पायल गौरव बहादरपुरे यांच्या वाटप क्षेत्रांस पुर्व बाजुलगत पुर्वापार वहिवाटी वापर रस्ता असून तसेच अ.नं.. 9 ते 11 नामे अनुक्रमे सोनाली संतोष परदेशी, यश संतोष परदेशी अ.पा.क. सोनाली संतोष परदेशी व अंजली संतोष परदेशी अ.पा.क. सोनाली संतोष परदेशी यांच्या वाटप क्षेत्रांस पुर्व बाजुलगत पुर्वापार वहिवाटी वापर रस्ता असून सदरचे ज्या त्या वाटप क्षेत्रांस नमुद केलेले पुर्वापार वहिवाटी वापर रस्ते असून सदरचे जे ते वहीवाटी वापर रस्ते हे ज्या वाटप मिळकतीच्या ज्या त्या वाटप धारकांना ज्या त्या वाटप मिळकतीस वापर करणेकामी आहे व राहतील. हक्कसोडबाबत :- वर कलम 1 अ ते 1ड मध्ये वर तपशिलांत वर्णन केल्याप्रमाणे आपसांत अर्जदारनं. 1 ते 12 यांचे दरम्यान क्षेत्राचे व पाणी हिश्याचे वाटप झालेले असून ज्याच्या त्याच्या वाटप क्षेत्रातून ऊर्वरित कुटूंबीयांनी आपआपला हक्क ज्या त्या वाटप धारकांच्या लाभात सोडून दिलेला आहे. तसेच कलम 1अ ते 1ड मध्ये वर्णन केलेल्या चारही मिळकतींच्या अधिकार अभिलेखांत अ.नं.6 नामे ओम शंकर परदेशी यांचे नांवापुढील अ.पा.क. चा शेरा कमी करून वाटपांस अंमल देण्यात यावा. तसेच कलम 1अ ते 1ड मध्ये वर्णन केलेल्या चारही मिळकतींच्या अधिकार अभिलेखांत अ.नं.7 व 8 नामे अनुक्रमे प्रिती शंकर परदेशी व पायल शंकर परदेशी यांचे विवाह झाला असल्याने त्यांचे विवाहानंतरचे नांवे अनुक्रमे प्रिती कल्पेश बेलदार व पायल गौरव बहादरपुरे अशी नांवे झाली असून त्यांचे आधारकार्डदेखील लग्नानंतच्या नांवाने असून त्यांच्या वाटपक्षेत्रांस त्यांचे लग्नांनंतरचे नांवे अनुक्रमे प्रिती कल्पेश बेलदार व पायल गौरव बहादरपुरे दाखल करून वाटपांस अंमल देण्यात यावा. तसेच कलम 1ड मध्ये वर्णन केलेल्या मौजे बाणगांव बु. येथील गट नं.260/5 यापैकी खाते क्र.664 अन्वये कै. रामदास कचरू कुमावत हे कुटूंबाचे मुळ पुरुष असतांना त्यांचे निधनापश्चात अधिकार अभिलेखांत अ.नं.1 ते 12 यांचे नांवाची वारसनोंद झाली असून परंतु वारसनोंद होतेवेळी अनावधानाने मयत कै. रामदास कचरू कुमावत यांचे नांव कमी झालेले नसल्याने सदर वाटपांस मयत कै. रामदास कचरू कुमावत यांचे नांव कमी करून वाटपांस अंमल देण्यात यावा. अटी व शर्ती – 1) सदर जमिनीचे 7/12 वरील इतर हक्कातील शेरे/बोजे कायम ठेवावे 2) सदर जमिनीचे नवीन पोट हिस्से करून स्वतंत्र 7/12 वेगळा करू नये. 3) जमिनीची शर्त कायम राहील. 4) सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत/बोजाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांनी राहील. 5) वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा. 6) विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल. 7) वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेउन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल. 8) सिलींग कायदयास बाधा येणार नाही, या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे. 9) खाते फोडीमुळे खातेदार भुमीहीन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीं चा फायदा घेता येणार नाही. 10) अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु. १००/- च्या स्टॅपवर वाटपपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल. 11) सदर विभाजनाबाबत / बोजाबाबत अथवा जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात वाद उपस्थित झाल्यास, अथवा भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल तसेच मे. न्यायालयाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. 12) वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही. वरील प्रमाणे वाटप केली असून मा.तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 195/2026 नांदगाव दिनांक 08/09/2026 आदेशा वरोन नोंद केली असे.