Ferfar #2013 · बाणगाव बु.।।
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 225
- Talathi
- शरीफगनीशेख
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 242/2026 नांदगाव
आदेश दिनांक : 28/10/2026
आदेश :-
अर्जदार प्रल्हाद मारुती खैरनार रा. मल्हारवाडी ता.नांदगाव जि.नाशिक येथील जमिनीचे विभाजन परवानगी मिळणेकामी मौजे बाणगाव बु ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 225 ह्या जमिनीचे विभाजनाबाबत अर्ज केला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 नुसार खालील प्रमाणे विभाजन केले असे.
1) ग.नं. 225, क्षेत्र 0 हे. 40 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 0 रु 48 पैसे, दिशा पूर्व विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- आनंदा गणपत खैरनार
2) ग.नं. 225 क्षेत्र 0 हे. 64 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 0 रु 76 पैसे, दिशा मध्य विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- मुरलीधर गणपत खैरनार
3) ग.नं. 225 क्षेत्र 0 हे. 60 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 0 रु 70 पैसे, दिशा पश्चिम विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- प्रल्हाद मारुती खैरनार, जयेश मारुती खैरनार
टिप :-
सदर गट नं. २२५ जिजाबाई मारुती खैरनार, मनिषा किरण एंडाईत यांचे नावे भोगवटदार सदरी असून त्यांना त्यांच्या लग्नाच्या वेळी सर्व काही मिळाले असून तरी या मिळकतीतून काही घेण्याचे नाही. त्यामुळे भोगवटदार सदरी त्यांचे असलेले नावे कमी करण्यात यावे.
सदर मिळकतीमध्ये असणारी विहीर ही मुरलीधर गणपत खैरनार यांचे हिश्यात येत असून त्यामध्ये पाणी वापराचा हिस्सा आनंदा गणपत खैरनार यांना ३३ पैसे, मुरलीधर गणपत खैरनार यांना ३४ पैसे, व प्रल्हाद मारुती खैरनार ,जयेश मारुती खैरनार यांना सामाईक रित्या ३३ पैसे हिस्सा राहील.
तसेच सदर मिळकतीमध्ये असणारी विहीर ही मुरलीधर गणपत खैरनार यांचे हिश्यात येत असून त्या विहिरीवर जाण्यासाठी उत्तर - दक्षिण असा १० फुट रुंदीचा वहिवाट रस्ता आनंदा गणपत खैरनार, मुरलीधर गणपत खैरनार, प्रल्हाद मारुती खैरनार, जयेश मारुती खैरनार यांना सामाईक रित्या राहील.
अटी व शर्ती –
1) सदर जमिनीचे 7/12 वरील इतर हक्कातील शेरे/बोजे कायम ठेवावे
2) जमिनीची शर्त कायम राहील.
3) सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत/बोजाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांनी राहील.
4) वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा.
5) विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल.
6) वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेउन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल.
7) सिलींग कायदयास बाधा येणार नाही, या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे.
8) खाते फोडीमुळे खातेदार भुमीहीन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीं चा फायदा घेता येणार नाही.
9) अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु. १००/- च्या स्टॅपवर वाटपपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.
10) सदर विभाजनाबाबत / बोजाबाबत अथवा जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात वाद उपस्थित झाल्यास, अथवा भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल तसेच मे. न्यायालयाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील.
11) वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही.
वरील प्रमाणे वाटप केली असून मा.तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 242/2026 नांदगाव दिनांक 28/10/2026 आदेशा वरोन नोंद केली असे.