सातबारा Watch

← भालुर

Ferfar #3643 · भालुर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
301/2/3, 330/2/1
Talathi
बी.एम.घोडके
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 202/2026 नांदगाव आदेश दिनांक : 16/09/2026 आदेश वाटप :- अर्जदार राजेंद्र दत्तात्रय आहेर रा. भालूर ता.नांदगाव जि.नाशिक येथील जमिनीचे विभाजन परवानगी मिळणेकामी मौजे भालूर ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 301/2/3, 330/2/1 ह्या जमिनीचे विभाजनाबाबत अर्ज केला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जीमिनीचे विभाजन नियम.1967 नुसार विभाजनास खालील प्रमाणे परवानगी दिली असे. 1) ग.नं. 301/2/3, क्षेत्र 1 हे. 33 आर, पो.ख. 0 हे 10 आर, एकूण क्षेत्र 1 हे 43 आर, आकार 1 रु 31 पैसे, दिशा संपूर्ण विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- उज्वला राजेंद्र आहेर 2) ग.नं. 330/2/1, क्षेत्र 0 हे. 48 आर, पो.ख. 0 हे 01 आर, एकूण क्षेत्र 0 हे 49 आर आकार 0 रु 76 पैसे, दिशा संपूर्ण विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- उज्वला राजेंद्र आहेर टीप :- 1) ग.नं. 330/1 मधील विहिरीत राजेंद्र दत्तात्रय आहेर यांच्या सामाईक विहिरीत ०.५० पैसे हिस्सा असून त्या हिस्सा पैकी ०.२५ पैसे हिस्सा उज्वला राजेंद्र आहेर हिचा राहिल. तसेच ३ बोअरवेल मध्ये राजेंद्र दत्तात्रय आहेर यांच्या सामाईक बोअरवेल मध्ये ०.५० पैसे हिस्सा असून त्या हिस्सा पैकी ०.२५ पैसे हिस्सा उज्वला राजेंद्र आहेर हिचा राहिल. अटी व शर्ती – 1) सदर जमिनीचे 7/12 वरील इतर हक्कातील शेरे/बोजे कायम ठेवावे. 2) जमिनीची शर्त कायम राहील. 3) सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत /बोजा बाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील. 4) वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने प्रतिवर्षी भरावा. 5) विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने/नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबधित जमीन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नविन धारकावर राहील. 6) वरील गटाचे विभाजन करता कामा नये किवा परवानगी घेऊन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकावर बंधनकारक राहील. 7) सिलिंग कायद्यास बाधा येणार नाही. या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे. 8) खाते फोडीमुळे खातेदार भूमिहीन झालेस अगर अत्यल्प भूधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही. 9) अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु 100/- च्या स्टँपवर वाटपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहील. 10) सदर विभाजनाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास/बोजाबाबत/मालकी हक्काबाबत मे.न्यायालयात भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील.तसेच न्यायालयीन आदेश सर्व हितसंबधितावर बंधनकारक राहतील. 11) वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राह्य राहणार नाही. वरील प्रमाणे वाटप केली असून मा.तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 202/2026 नांदगाव दिनांक 16/09/2026 आदेशा वरोन नोंद केली असे.