Ferfar #3530 · जामदरी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/21/2
- Talathi
- संदीप साहेबराव बिऱ्हाडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/ज.वि./एसआर-233/2026
आदेश दिनांक : 23/10/2026
श्री.शंकर जगन्नाथ मोरे व इतर यांनी मा. तहसिलदार साहेब नांदगाव यांचेकडून महाराष्ट् जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 नुसार खालील प्रमाणे अटी व शर्ती 1 ते 12 यांस अधिन राहुन विभाजन केले असे.
अ.क्र. गावाचे नाव गट नं. क्षेत्र (हे.आर) आकार(रु.पैसे) दिशा वाटपाने ज्याच्या नावे गेली आहे,त्यांचे नाव
1. जामदरी 192/21/2 0.79.50 1.08 पश्चिम सोमनाथ शंकर मोरे
2. जामदरी 192/21/2 0.79.50 1.08 पूर्व बाळनाथ शंकर मोरे
अटी व शर्ती –
1. सदर जमिनीचे 7/12 वरील इतर हक्कातील शेरे / बोजे कायम ठेवावे.
2. सदर जमिनीचे नवीन पोट हिस्से करुन स्वतंत्र 7/12 वेगळा करु नये.
3. जमिनीची शर्त कायम राहिल.
4. सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत / बोजाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वो जबाबदारी अर्जदार यांची राहिल.
5. वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा.
6. विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल.
7. वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेऊन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल.
8. सिलींग कायदयास बाधा येणार नाही, याअटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे.
9. खाते फोडीमुळे खातेदार भुमीहिन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.
10. अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु.100/- च्या स्टॅपवर वाटपपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.
11. सदर विभाजनाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास / बोजाबाबत / मालकी हक्काबाबत न्यायालयात भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल, तसेच न्यायालयीन आदेश सर्व हितसंबंधितांवर बंधनकारक राहतील.
12. वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही.
मा.तहसिलदार साहेब नांदगाव यांचेकडील आदेश तहसिल कार्यालय नांदगाव जि.नाशिक क्र.आरटीएस/ज.वि./एसआर-233/2026 दिनांक 23/10/2026 वरून नोंद केली असे.आदेशावरून नोंद केली असे.