Ferfar #716 · गणेश नगर
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/41/1
- Talathi
- अविनाश रमेश नलवडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.न.अ.श./शर्तभंग/एस.आर/38/2025
आदेश दिनांक : 18/10/2026
अर्जदार प्रशांत शिवाजी सानप , रा. कासारी ता.नांदगाव जि.नाशिक यांनी मौजे गणेशनगर ता. नांदगांव येथील गट नं. 1/41/1 क्षेत्र 1हे. 91 आर, आकार 2 35 रु.पै. या मिळकतीचा शर्तभंग नियमानुकूल करणेबाबत अर्ज इकडील कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार या कार्यालयाचे उक्त पत्र क्र.2 अन्वये प्रस्ताव मान्यतेस्वत मा. शासनास सादर करण्यात आलेला होता.
प्रकरणी समाविष्ट कागदपत्रे पहाता, मौजे गणेशनगर ता. नांदगाव येथील अर्ज मिळकत मुळ मालक नरहर बलवंत सोनार यांना नवीन अविभाज्य शर्तीवर मिळालेली आहे. प्रस्तुतची मिळकती संदर्भात अर्जदार यांनी खरेदीखत दस्त क्र.११९४ /2015 दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात दि. 07 /05 /2015 रोजी नोंदणीकृत केलेले होते. त्यानुसार अर्ज मिळकतीस अर्जदार यांचे नाव दाखल झालेले आहे. मात्र सदर बाबत सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतलेली नसल्याने शर्तभंग होऊन अर्ज मिळकतीच्या कब्जेदार सदरी सरकार नाव दाखल करण्यात आलेले आहे. सदर बाबत अधिकार अभिलेखात नोंद नं. ४०७ दाखल झालेली आहे.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परीपत्रक क्र. जमीन-2026/ प्र.क्र.39 /(ई-15392559) दि.05 जून, 2026 अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 37 अन्वये, शर्तभंग विषयक अधिकार प्रत्यार्पित करणेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार रु. 10 लाखापर्यंत अधिमुल्य / शुल्क /अनर्जित उत्पन्नाच्या हिश्याची रकमेबाबत सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असल्याबाबत नमूद आहे. तसेच सदर बाबत आकारावयाची अधिमुल्य / शुल्क किंवा अनर्जित उत्पन्नाच्या हिश्याची परिगणना करताना शासन निर्णय दि.०५/०७/२०२३ मधील टिप क्र. (२) मध्ये नमुद केलेल्या तरतूदीनुसार अथवा अन्य काही शासन आदेश असल्यास त्यामधील तरतूदीनुसार आकारणी करणे बाबत नमुद आहे.
सदर बाबत या कार्यालयाकडील पत्र क्र.जमीन -1/कावि/50/2026 दिनांक 30/07/2026 अन्वये अनार्जित रक्कम रुपये 2 22 000/- (अक्षरी दोन लाख बावीस हजार रुपये मात्र) भरणा करणेबाबत अर्जदार यांना कळविणेत येवून, तहसीलदार नांदगाव जि.नाशिक यांना प्रत देणेत आलेली आहे. त्यानूसार तहसीलदार नांदगांव जि. नाशिक याचेकडील पत्र क्र.जमा/1/कावि/409/2026 दिनांक 02/09/2026अन्वये नमुद रक्कम सरकारी खजिन्यात भरणा केलेबाबत डिफेस चलन क्र. एमएच 009047703202627- पी, दि. 26/08/2026 या कार्यालयास सादर केले आहे.
जिल्हाधिकारी नाशिक या आदेशाव्दारे प्रशांत शिवाजी सानप , रा. कासारी ता.नांदगाव जि. नाशिक यांचे मालकीच्या मौजे गणेशनगर ता. नांदगांव येथील गट नं. 1/41/1 क्षेत्र 1 हे. 91 आर, आकार 2.35 रु. पै या नवीनअविभाज्य शर्त भोगवटादार वर्ग-2 मिळकती संदर्भात खरेदीखत दस्त क्र. 1194/2015 अन्वये सक्षम प्राधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय झालेला हस्तांतरणाचा शर्तभंग पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहुन नियमानुकूल करण्यास परवानगी देत आहे.
अटी व शर्ती
1. अर्जदार हे मौजे गणेशनगर ता.नांदगाव येथील अर्ज मिळकत नवीन शर्त भोगवटादार वर्ग-2 धारणा प्रकारावर कृषिक प्रयोजनार्थ धारण करतील.
2. सदर आदेशानुसार फक्त प्रकरणी झालेला शर्तभंग नियमानुकूल करण्यात येत आहे. तथापि, प्रस्तुतची मिळकत भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करावयाची असल्यास प्रकरणी प्रचलित शासन तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात यावी.
3. सदरच्या मिळकतीस सक्षम प्राधिकान्यांच्या पुर्वपरवानगीशिवाय विक्री, गहाणखत, तारण, बक्षिसपत्र, बाटपपत्र, देणगी, या व इतर कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करता येणार नाही.
4. सदर मिळकतीचा कृषिक प्रयोजना व्यतिरीक्त वापर करावयाचा झाल्यास सक्षम अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
5. मौजे गणेशनगर ता. नांदगाव येथील अर्ज मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल शर्तभंग संदर्भांतील शेरा कमी करण्यात यावा, तथापि, अर्ज मिळकती संदर्भात इतर अधिकारात दाखल वित्तीय संस्थेचे बोजे कायम राहतील.
6. प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्र यांच्यामध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळून आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.
7. सदर मिळकती संदर्भात वित्तीय बोजे असल्यास किंवा भविष्यात निर्माण झाल्यास त्याची परतफेड करण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहील.
8. अर्ज मिळकतीच्या मालकी अथवा हस्तांतरण हक्काबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचे वाद प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडुन पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीच्या हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहतील,
9. भविष्यात अर्ज मिळकती संदर्भात हरकत / तक्रार प्राप्त झाल्यास व तपासणी अंती प्रस्तुत हरकत / तक्रारी मध्ये तथ्य आढळून आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.
10. अधिकार अभिलेख व जमीनीच्या मालकी हक्काबाबत व इतर हक्कांबाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास व त्यामध्ये काही तथ्य आढळल्यास तसेच मालकी हक्काबाबत काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास किंवा सदर मिळकतीबाबत न्यायालयाचे काही निर्णय झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांची राहील.
11. अर्जदार यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास तसेच मिळकतीच्या क्षेत्राबाबत तफावत आढळून आल्यास अगर प्रचलित कायदा व नियमांचा भंग झाल्यास व चौकशी अंती सत्यता आढळून आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.
12. वरील पैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती तसे निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास व शास्तीस पात्र राहील.
मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचे कडील आदेश क्र.न.अ.श./शर्तभंग/एस.आर/38/2025 नाशिक दिनांक 18/10/2026 आदेशांवरोन नोंद केली असे