Ferfar #1318 · ढेकू बु.
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 159
आदेश दिनांक : 03/08/2026
आदेशावरून:-
मनसुब माणिकराव सूर्यवंशी रा. ढेकू खुर्द ता. नांदगाव येथील रहिवासी असून त्यांनी मा. तहसीलदार साहेब नांदगाव यांचेकडे म.ज.म 1966 चे कलम 85 अन्वये आपापसांत वाटप करण्यासंदर्भात अर्ज सादर केला होता त्यानुषंगाने मा. तहसीलदार साहेब नांदगाव यांचेकडील आदेश क्र.आरटीएस ज.वि./एसआर/159/2026 दि.03/08/2026 अन्वये खालीलप्रमाणे वाटप करून दिले आहे.
अ.क्र.- गावाचे नाव – दिशा - गट नं – क्षेत्र – आकार - वाटपाने आलेले नाव
1. ढेकू बुद्रुक – पूर्वेकडील – 112/1/अ- 0.81- 1.20 – मनसुब माणिकराव सूर्यवंशी
2. ढेकू बुद्रुक – पूर्वेकडील – 112/1/ब – 0.84 – 1.75 – किसन माणिकराव सूर्यवंशी
3. ढेकू बुद्रुक – पश्चिमेकडील – 112/1/ब – 0.14 – 0.20 – विष्णू माणिकराव सूर्यवंशी
4. ढेकू बुद्रुक – संपूर्ण क्षेत्र – 112/2/ब – 0.70 – 1.50 – विष्णू माणिकराव सूर्यवंशी
5. ढेकू बुद्रुक – संपूर्ण क्षेत्र – 112/3/ब – 0.99 – 1.50 – रतन माणिकराव सूर्यवंशी
6. ढेकू बुद्रुक – संपूर्ण क्षेत्र – 112/3/अ – 0.81 – 1.50 – बाळू उर्फ बाळासाहेब माणिकराव सूर्यवंशी
7. ढेकू बुद्रुक – संपूर्ण क्षेत्र – 112/2/अ – 0.18 – 0.36 – मनसुब माणिकराव सूर्यवंशी
8. ढेकू बुद्रुक – संपूर्ण क्षेत्र – 112/2/अ – 0.14 – 0.32 – किसन माणिकराव सूर्यवंशी
9. ढेकू बुद्रुक – संपूर्ण क्षेत्र – 112/2/अ – 0.20 – 0.42 – विष्णू माणिकराव सूर्यवंशी
10. ढेकू बुद्रुक – संपूर्ण क्षेत्र – 112/2/अ – 0.18 – 0.32 – बाळू उर्फ बाळासाहेब माणिकराव सूर्यवंशी
येणेप्रमाणे विभाजनास परवानगी दिली असून त्यानुसार खालील अटी व शर्ती नुसार परवानगी दिली आहे.
अटी व शर्ती :-
१) सदर जमिनीचे ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील शेरे / बोजे कायम ठेवावे.
२) जमिनीचे शर्त कायम राहील.
३) सदर जमिनीचे मालकीहक्काबाबत / बोजावावत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी अर्जदार यांची राहील.
४) वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने प्रतिवर्षी भरावा.
५) विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्क व बंधनक/ नियंत्रक विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमीन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहातील्व त्याची जबाबदारी नवीन धारकावर बंधनकारक राहील.
६) वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेऊन विभाजन केलेस पोत हिम्सा मोजणी फी भरणे धारकावर बंधनकारक राहील.
७) सिलीग कायद्यास बाधा येणार नाही, या अटीवरच विभाजनास परवानगी देणेस आलेली आहे.
८) खातेफोडीमुळे खातेदार भूमिहीन झालेस अगर अत्यल्प भूधारक झाल्यास शासनाच्या सवलतीच्या फायदा घेता येणार नाही.
९) अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेस आलेले असून ते बरोबर असल्याबाबत रु. १००/- च्या स्पॅम्पवर वाटप तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहील.
१०) प्रस्तुत प्रकरणातील कागदपत्राचे अवलोकन केले असता ७/१२ उतात्यावरील अभिलेखात दाखल असलेली प्र.बादी प्र.वादी क्र. ५ चंद्रभाबाई माणिकराव सूर्यवंशी (अर्जदाराची आई), प्र.वादी क्र.६ विठाबाई अशोक जाधव (अर्जदाराची वहिण) यांनी वरील मिळकतीमध्ये हिस्सा घेतलेला नसून त्यांनी त्यांच्या भावांच्या लाभात हक्कसोड करून दिले असून यांनी हक्क मोइन दिला असलेने त्यांची नावे कमी करण्यात यावी.