Ferfar #6021 · जातेगाव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/1
- Talathi
- तुषार सुदाम बोडके
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
आदेशांवरोन :-
बाजूस दाखल केलेला ग.नं 110/1 मधील चिमा बाळा लाठे रा. जातेगाव यांनी आपले शेत जमीन मौजे जातेगाव ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग .नं. 110/1 क्षेत्र 2 हे.40 आर, आकार 2 रु 40 पैसे सदर गट नंबर हा नविन अविभाज्य शर्तीने भोगवटादार वर्ग 2 ने धारण केलेले आहे. यास शासन अधिसूचना दिनांक 08/03/2019 अन्वये भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेसाठी अर्ज शेतजमिनीचे परवानगी मिळणे कामी त्यांनी दिनांक 28/08/2025 रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव याच्या कडे अर्ज केला होता त्या अनुषंगाने मा.अपर जिल्हाधिकारी सो. यांनी ,सहा संचालक नगररचना ,नाशिक यांचेकडील पत्र क्र.मौ जातेगाव.ता.नांदगाव ग.नं.110/1/सनरना/1622 दि.07/09/2026, उप विभागीय वन अधिकारी ,मालेगाव यांचेकडील पत्र क्र.कक्ष-3/जमीन /146/4397/सन 2019 दि. 05/03/2020 महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना क्रमांक /जमीन/2018/प्र.क्र.90/ज-1 दि. 08/03/2019 अन्वये मधील तरतुदी नुसार मा.अप्परजिल्हाधिकारी साहेब यांनी मुल्याकन रकमेच्या रूपांतरण अधिमूल्याची 25 टक्के नजराणा र.रु.4,11,125/-( अक्षरी चार लाख अकरा हजार एकशे पंचवीस मात्र रुपये ) शासकीय खजिन्यात भरणा करून अर्जदार यांनी चलनाची मूळ व डिफेस प्रत उपोद्धातातील क्र.7 अन्वये सादर केलेली आहे.
खालील अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.
अटी व शर्ती :-
1. उक्त आदेशानंतर जमीन मालक चिमा बाळा लाठे यांचे मालकीचे मौजे जातेगाव ता. नांदगांव येथील अर्ज मिळकत भोगवटादार वर्ग 1 धारणाधिकारावर कृषिक प्रयोजनार्थ धारण करतील.
2. विषयांकीत जमीनीया अकृषिक प्रयोजनासाठी वापर करावयाचा झाल्यास, सक्षम अधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल व अशी परवानगी देत असताना नियमानुसार येणारी अधिमुल्यांची रक्कम शासनास अदा करणे जमीन धारक यांना बंधनकारक राहील.
3. प्रस्तुत जमीनीचे भोगवटदार वर्ग1 मध्ये रुपांतरण झाल्यावर महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 व महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 मधील तरतुदीचा भंग होणार नाही याची तहसिलदार यांनी दक्षता घ्यावी.
4. विषयांकीत जमीनीच्या रुपांतर अधिमूल्य आकारणीच्या रकमेबाबत भविष्यात लेखापरीक्षणात तफावत आढळून आल्यास येणारी फरकाची रक्कम शासनजमा करणे जमीन मालक यांना बंधकारक राहील. सदर रक्कम न भरल्यास जमीन महसूलाची थकबाकी म्हणून सक्तीने वसूल करण्यात येईल.
5. संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रस्तुत शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावर भुधारणा पध्दती भोगवटादर वर्ग 1 व इतर अधिकारात अशी नोंद घेण्यात यावी.
6. अर्जदार यांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले सर्व कागदपत्रे सत्य आहेत असे गृहीत धरुन सदर नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेली शेतजमीन भोवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये कृषिक प्रयोजनासाठी रुपांतरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. भविष्यात यात कोणतीही असत्यता आढळल्यास किंवा मालकी हक्काबाबत विवाद निर्माण झाल्यास ती निराकरण करण्याची जबाबदारी अर्जदार (जमीन मालक) यांची राहील.
7. प्रस्तुत जमीनीची रीतसर मोजणी करुन घेऊन 7/12 उतारा स्वतंत्र करण्याची व निघाल्यास जमीन महसूलाची थकबाकी शासनजमा करण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहील.
8. अर्ज मिळकतीच्या मालकी अथवा हस्तांतरण हक्काबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचे वाद प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडून पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीच्या हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहतील.
9. अधिकार अभिलेख व जमीनीच्या मालकी हक्काबाबत व इतर हक्कांबाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास व त्यामध्ये काही तथ्य आढळल्यास तसेच मालकी हक्काबाबत काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास किंवा सदर मिळकतीबाबत न्यायालयाचे काही निर्णय झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांची राहील.
10. अर्जदार यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास तसेच मिळकतीच्या क्षेत्राबाबत तफावत आढळून आल्यास अगर प्रचलित कायदा व नियमांचा भंग झाल्यास व चौकशी अंती सत्यता आढळून आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.
11. या आदेशातील कोणत्याही शर्त अगर अटींचा भंग झाल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.
मा. अपर जिल्हाधिकारी मालेगाव वरील सर्व तरतुदी नुसार चिमा बाळा लाठे यांचे नावे असलेले ग .नं. 110/1 क्षेत्र 2 हे.40 आर, आकार 7 रु 10 पैसे मौजे जातेगाव ता.नांदगाव जि.नाशिक भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 मध्ये कृषिक प्रयोजनार्थ रुपांतर करण्यास करतील अशा प्रकारचा आदेश अटी व शर्ती 1 ते 11 यास अधीन राहून परवानगी दिली आहे.
सदर नोंद मा.अपर जिल्हाधिकारी मालेगाव याचे कडील आदेश क्रमांक क्र.नअश/भोग-1/एसआर/216/2025 मालेगाव दिनांक 30/10/2026 अन्वये नोंद केली असे.