सातबारा Watch

← बोराळे

Ferfar #1570 · बोराळे

चांदवड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
262/1/अ, 262/1/ब
Talathi
रविंद्र माणिक पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदार जयश्री किरण पवार यांनी दिनांक 07/10/2026 रोजी अर्ज देऊन कळविले आहे कि, निफाड येथील मे.जिल्हा न्यायाधीश ,निफाड यांचे कोर्टातील दिवाणी अपील क्र. 87/2019 दिवाणी दाव्यात वादी जयश्री किरण पवार , श्वेता किरण पवार , यश किरण पवार व हिराबाई दत्तात्रय पवार यांच्यामध्ये व प्रतिवादी अ.क्र. 1 निर्मला जनार्दन जाधव , अ.क्र. 2 जनार्दन कारभारी जाधव व अ.क्र. 3 भुषण दत्तात्रय पवार यांचेमध्ये आपसात समजोता झाला आहे. मिळकतीचे वर्णन :- 1) मौजे बोराळे ता.चांदवड येथील शेती गट नंबर 262 / 1 / अ पैकी क्षेत्र 0 हे. 43 आर, आकार 05 रु. 24 पैसे हि मिळकत. सदर गट नंबर मध्ये एक विहीर आहे. तिचे भांडे पाणी पाळी प्रमाणे व क्षेत्राप्रमाणे घेणेचे येणेचे हक्क वहिवाटीसह. 2) गट नंबर 262 / 1 / ब क्षेत्र 1 हे. 24 आर, आकार 05 रु. 18 पैसे हि मिळकत. सदर गट नंबर 262 / 1 / अ मध्ये एक विहीर आहे. तिचे भांडे पाणी पाळी प्रमाणे व क्षेत्राप्रमाणे घेणेचे येणेचे हक्क वहिवाटीसह. मे.जिल्हा न्यायाधीश ,निफाड यांचे कोर्टातील दिवाणी अपील क्र. 87/2019 दिवाणी दाव्यात निशाणी नंबर 29 वर दिनांक 12/06/2026 रोजी समजोता झाला आहे. त्या समजोत्या मधील प्रमुख महसुली विषयक बाबी. येणेप्रमाणे उपरोक्त मिळकत हि किरण दत्तात्रय पवार मयत वारस जयश्री किरण पवार , श्वेता किरण पवार , यश किरण पवार व हिराबाई दत्तात्रय पवार यांच्या मालकीची आहे. समजोतीपोटी र.रु. 20,00,000/- प्रतिवादी 1 व 2 यांना अदा केली आहे. वादातील मिळकतीबाबत दिनांक 22/08/2018 सह दुय्यम निबंधक चांदवड यांचे कडील दस्त क्रमांक 372/2008 ने नोंदविलेले खरेदीखत रद्द करण्याचे ठरले आहे. प्रतिवादी यांचे लाभतील दिनांक 29/08/2005 रोजीचे मुखत्यारपत्र दस्त क्र. 1727/2005 हे रद्द करण्यात येत आहे. दावा मिळकतीवर निवृत्ती शेळके पाटील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा बोजा आहे त्या बोजाचे निवारण करणेची जबाबदारी वादी जयश्री किरण पवार , श्वेता किरण पवार , यश किरण पवार व हिराबाई दत्तात्रय पवार यांची राहणार आहे. प्रतिवादी अ.क्र. 3 भुषण दत्तात्रय पवार यांचेवर समजोतनामा बंधनकारक नाही. याबरोबरच गैरमहसूली अन्य बाबींचा समजोता झाला आहे. उपरोक्त मिळकती बाबत सह दुय्यम निबंधक चांदवड यांनी त्यांचेकडील दस्त क्रमांक 372/2008 दिनांक 22/02/2008 यात दिनांक 22/09/2026 रोजी केलेल्या सुची क्रमांक 2 यात रकाना ( 2 ) व ( 3 ) यात दुरुस्ती केली टी येणेप्रमाणे दस्त क्रमांक 372/2008 दिनांक 22/02/2008 हा दस्त रद्द करण्यात येत आहे. सदर दस्त रद्द झाल्याने सदर मिळकती बाबत मुळ परिस्थिती करणे कामी मिळकतीवर दाखल असलेले नाव निर्मला जनार्दन जाधव हे नाव क्षेत्रासह कमी करून त्या एवजी जयश्री किरण पवार , श्वेता किरण पवार अज्ञान पालन कर्ता जयश्री , यश किरण पवार व हिराबाई दत्तात्रय पवार यांची नावे दाखल केली असे. श्वेता किरण पवार अज्ञान पालन कर्ता जयश्री , यश किरण पवार हे आजमितीस सज्ञान झाले असल्याने त्यांचे अज्ञान पालन कर्ता जयश्री हा शेरा कमी केला असे. सदर मिळकती वरील 1) मा.उपविभागीय अधिकारी उपविभाग मालेगाव यांचेकडील आदेश क्र. आरटीएस / अपील / 77 / 2009 दि. 01/04/2013 हा शेरा व 2) मा. दिवानी न्यायालय वरिष्ठ स्थर निफाड यांचेकडील दावा 87 / 2019 निशाणी नं. 4 मध्ये अपिलाचे निकालापर्यंत मनाई हुकुम त्यांचे क्षेत्रा करिता दिलेला आहे. हे शेरे आत्ता दावा प्रलंबित राहिला नसल्याने कमी केला असे. विहिरीच्या वहिवाटीचा शेरा दुरुस्ती केली असे.