सातबारा Watch

← कानडगाव

Ferfar #2653 · कानडगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
198/3
Talathi
सौरभ मुकुंद धनेश्वर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- दादाराम बळीराम घटकर रा. कानडगाव(खाता क्रमांक1240) गट/सर्व्हे क्रमांक198/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम बांधटाकून दक्षिणेकडून लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- ज्ञानेश्वर दादाराम घटकर , (खाता क्रमांक :-1297)गट/सर्व्हे क्रमांक 198/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2749 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. मौजे कानडगाव येथील 198/3 पैकी दादाराम बळीराम घटकर यांना वाटपाने दिलेल्या क्षेत्रात नदी लगत 1 विहीर असून त्या विहीर भांडे पाणी यात दादाराम बळीराम घटकर, छगन बळीराम घटकर व बबन बळीराम घटकर यांचा सामाईक हिस्सा आहे. तसेच दादाराम बळीराम घटकर यांचा पाणी पाळी प्रमाणे पाणी घेण्याचा हक्क हा ज्ञानेश्वर दादाराम घटकर यांना वाटपाने दिला आहे. तसेच सदर विहिरीवर जाणे येणे कामी पूर्वेकडून, दक्षिण-उत्तर लांबीची पाउलवाट ही ज्ञानेश्वर दादाराम घटकर , छगन बळीराम घटकर व बबन बळीराम घटकर यांना सामाईक राहील. मौजे कानडगाव येथील 198/3 पैकी ज्ञानेश्वर दादाराम घटकर यांना वाटपाने दिलेल्या क्षेत्रात नदी लगत 1 विहीर स्वतंत्र आहे. सदर स्वतंत्र विहीर ही ज्ञानेश्वर दादाराम घटकर यांची स्वतंत्र राहील. सदर वाटप पत्र दस्त नं. 2749/26 दिनांक 05/08/2026 च्या सूची क्र. 2 मध्ये क्षेत्रफळ या पुढे 0.0000 हे आर असे चुकीने नमूद झाल्याने सदर चूक दुरुस्ती करण्यासाठी चूक दुरुस्ती दस्त सह दु. नि. चांदवड यांचे कडील दस्त 2838/2026 क्रमांकचे चूक दुरुस्ती पत्र केले असे. सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.