सातबारा Watch

← रामशेज

Ferfar #4083 · रामशेज

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
197/1
Talathi
सचिन दयाराम कराटे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026रामशेज तहसिल कार्यालय दिंडोरी क. कुका/वतन /कावि/६१३/२०२६ दिंडोरी दिनांक: 08/09/2026 आदेश अर्जदार श्रीम. निलीमा संदिप बोडके रा. रामशेज ता. दिंडोरी जि. नाशिक यांनी दिनांक २०/०३/२०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी नाशिक (कुळ कायदा) यांचेकडेस मौजे रामशेज ता. दिंडोरी जि. नाशिक पंचिल गट नं. १९७/१ पैकी स्वतंत्र आणवारीने धारण केलेले क्षेत्र ०१ हे. ७६ आर बोसी आकार रु. ०१.९८ पैसे पेको क्षेत्र 00 हे. ४० आर या मिळकतीची विक्री परवाणगी मिळणेबाबत अर्न सादर केलेला होता. परंतु सदरची मिळकत ही नियंत्रित सत्ता प्रकाराची असून भोगवटदार वर्ग-२ असल्याचे मा. जिल्हाधिकारी नाशिक यांचे कार्यालयाकडील पत्र क्रा, कक्ष-४/कुका-१/एसआर-८५/२०२६ दि. २३/०६/२०२६ यात नमूद केले आहे. त्यानु‌सार सदरचा अर्ज त्यांनी या कार्यालयाकडेस नियमानुसार कार्यवाही कामी पाठविलेला आहे. प्रस्तुत प्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन केले असता, मौजे रामशेज ता. दिंडोरी जि. नाशिक येथिल जुना गट नं. २२५ या नवीन गट नं. ११७/१ चा जुना सर्व्हे नं. २०७ असा आहे. सरव्हे नं. २०७ चे नोंद नं. २३७अन्वये खंडू मनाजी बोडके यांनी गुलाबचंद माणिकचंद शेठ मारवाडी यांचेकडून सदर मिळकतीचे साठेखत केलेले असून नाँद नं. २६१ नुसार त्यांनी सदरची मिळकत खरेदी केलेली असल्याचे दिसून येत आहे. नोंद नं. ४२५ नुसार मल्लीकार्जुन विश्वनाथ महमाने यांनी खंडू मनाजी बोडके व पांडु मनानी बोडके यांचेपासून दिनांक १३/०७/१९३७रोजी खरेदी घेतली आहे. नोंद नं. १०२६ मध्ये एकनाथ तुकाराम बोडके यांनी काशिनाथ भिमा शंकर महमाने यांचेपासुन दि. २०/०१/१९५८ रोजी खरेदी घेतली असुन खरेदी घेणार हा मुळचा संरक्षित कुळ आहे. सदरची जमीन गवताची नसून पिकाखालची आहे. त्याप्रमाणे सदर नोंदीमध्ये सदरचा व्यवहार कुळ कायदा कलम ६४ (२) प्रमाणे असल्याने इतर हक्कातील न.अ.शर्त म्हणून दाखला घेतला आहे. या नोंदीने इतर हक्कातील सं. कुळ म्हणून असलेले सर्व्हे नं. २०७ यातील नाव कमी केले आहे. यामुळे सदरची मिळकत ही संरक्षित कुळानेच खरेदी केल्याने सदरची मिळकत ही कुळ कायदयाने मिळालेली असल्याचे दिसून येते. तसेच अर्जदार हे सदर मिळकत ही १० वर्षाचे वरील व्यवहार असल्याने जमीन महसूल आकाराच्या ४० पट इतकी नजराणा रक्कम भरण्यास तयार आहे. तरी अर्जदार यांना शासकीय कामकाज, बैंक कामासाठी अडचण येत असल्याने सदरचा शेरा कमी करणेबावत विनंती केलेली आहे. सबब महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक टिएनसी-२४/२०१३/प्र.क्र. १९६/ज-१ दि. ७/५/२०१४ अन्वये मौजे रामशेज ता. दिंडोरी जि. नाशिक येथिल गट नं. १९७/१ या मिळकतीचे इतर अधिकारातील "सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन व नविन अविभाज्य शर्त" असा शेरा अर्जदार यांचेकडुन जमीन महसूल आकाराच्या ४० पट इतकी नजराणा रक्कम रूपये १६०/- इतकी दिनांक ०३/०९/२०२६ रोजी सरकारी खजिन्यात भरलेली असल्याने सदरचे शेरे कमी करणेस हरकत नाही, अशी माझी खात्री झालेली आहे. सबब मी तहसीलदार दिंडोरी मला प्राप्त अधिकारांचा वापर करुन वरील तरतुदीनुसार खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश १. अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे. २. मौजे रामशेज ता. दिंडोरी जि. नाशिक येथिल गट नं. १९७/१ या मिळकतीचे इतर अधिकारातील "सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी- कुळ कायद्याने प्राप्त जमीन व नविन अविभाज्य शर्त" असे शेरे कमी करण्यात यावेत. ३. सदरचा आदेश संबंधितांना कळविण्यात यावा.