सातबारा Watch

← वनारे

Ferfar #1277 · वनारे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
285/ब
Talathi
पोपट चंदर भोये
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- मंगला दौलत गांगोडे रा. वनारे (खाता क्रमांक 112) यांचे गट क्रमांक285/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वृषाली धनंजय भवर , (खाता क्रमांक :-865)गट क्रमांक 285/ब लागवडीयोग्य क्षेत्र 2.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मौजे वनारे शिवारापैकी गट नं.285/ ब पैकी मालकी हिश्याचे व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीचे दक्षिण दिशेकडील पुर्व पश्चिम असलेले क्षेत्र 2.91 आर आकार 2.00 पै. हि मिळकत मंगला दौलत गांगोडे यांचेपासून वृषाली धनंजय भवर यांनी रक्कम रु.12,66,723/- दि.19/10/2026 रोजी दस्त क्र.3630/2026 ने खरेदीने घेतेले असून सदरची मिळकत आदिवासी जमिन असलेने खरेदी खताने घेतले असून सदरचा खाते क्र. 112 चे मालक मंगला दौलत गांगोडे यांचे मालकी हिश्याची जमीन खरेदी घेणेपुर्वी भोगवटदार वर्ग 2 अशी होती परंतु गावी नोंद नं. 1267 ने व मा.अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.मशा/कक्ष/3/2/एसआर -835 /2026 नाशिक दि.09/09/2026 चे आदेशान्वये भोगवटादार वर्ग 1 केलेला आहे तसेच मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचेकडील आदेश क्र./कक्ष-4/कु.का.4/एस.आर./ 315/2026 नाशिक, दिनांक 30/09/2026 रोजीचे आदेशान्वये खालीलप्रमाणे अटी व शर्तीस अधिन राहुन परवानगी दिली आहे. 1) सौ. मंगला दौलत गांगोडे यांची जमिन सौ. वृषाली धनंजय भवर यांनाच विक्री करता येईल. 2) सौ. वृषाली धनंजय भवर यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधिन राहुन कृषिक प्रयोजनासाठी धारण करतील. 3) जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरून हि परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनु: जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील. 4) खरेदीदस्तावर धारक/ सहधारक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी. 5) जमिनीची विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासून पंधरा ( 15) दिवसानंतर तीन ( 3 ) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. 6) ) प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतीज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहील. 7) सदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील. 8) सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही. 9) सदर जमिनीचे साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु.12,66,723/- हि असून मुल्यांकनाची रक्कम रु.12,66,723/- एवढी आहे. मुल्यांकनाची रक्कम व साठेखतातील व्यवहाराची रक्कम एकसमान असल्याने मुल्यांकनाची रक्कम हि जमिनीची किमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे रक्कम रु.12,66,123/- ( अक्षरी रक्कम – बारा लाख सहासष्ट हजार सातशे तेवीस रुपये मात्र ) हि राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व या बाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा झालेबाबत प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्या शिवाय सह दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये. 10) प्रस्तुत मिळकती संबंधित भूधारकाचे एकुण क्षेत्र व लागु असलेला स्लॅब विचारात घेवुन निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भूधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नवीन भूधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नविन भूधारकाचे एकुण क्षेत्र लागु असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नवीन भूधारकाची राहील. या स्वरूपाचे हमी खरेदीखतात नमुद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील. 11) प्रश्नाधीन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसुली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारित होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील. 12) तहसीलदार दिंडोरी/ ग्राम महसुल अधिकारी, वनारे यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडुन धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्या शिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची फेरफार नोंद करु नये. 13) प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्यांचे निर्बंध लागू राहील अ)महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म.) - 1961 ब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम -1948 ड) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम -1974 (1974/35) ई) सदरची परवानगी फक्त याच कायद्यांतर्गत देण्यात आली आहे. या संबंधात नागरी जमिन ( कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1966, अन्य कोणत्याही कायद्यानुसार वा नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचे वर बंधनकारक राहील वरिल पैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती निष्पन झाल्यास सदरची परवानगी रद्द होनेस व शास्तीस पात्र राहील. खरेदी घेणार यांचे वडिलांचे नावे मौजे चेहडी खुर्द ता.निफाड जि.नाशिक येथे गट नं. 260 पै असलेने त्या शेतकरी कुटुंबातील आहेत. गावी अर्ज ,सुची क्र.2, खरेदीखताची छायांकित व साक्षांकीत प्रत आलेवरोन नोंद केली असे.