Ferfar #1371 · टिटवे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/3
- Talathi
- योगिता मोतीराम ठेपणे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
मौजे टिटवे शिवारापैकी गट नं 37/3 क्षेत्र 01 हे 84 आर आकार 0.82 हि शेतजमीन धनराज पांडुरंग वटाणे यांनी नविन अविभाज्य शर्तीवर धारण केलेली भोगवटादार वर्ग 2 ची शेतजमीन शासन अधिसूचना दि.08 मार्च 2019 अन्वये भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेबाबत परवानगी मिळनेकामी मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचे कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक क्र.कक्ष -४/कु का 4/एस आर -72/2024. नाशिक दिनांक. 26/03/2024 अन्वये खालील अटी व शर्तीस अधिन राहुन परवानगी दिलेली आहे.
1)श्री धनराज पांडुरंग वटाणे हे सदर जमीन त्यांचे मालकी हिश्याचे क्षेत्र 01 हे 84 आर आकार 0.82 हि जमीन भोगवटदार वर्ग-1 म्हणून धारण करतील.
2) भविष्यात लेखापरीक्षणात नजराणा कमी भरणा झाला असलेबाबत शक निघाल्यास फरकाची रक्कम भरणा करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील यांस अधिन राहुन परवानगी देण्यात येत आहे.
3) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार जमीन मालक यांनी प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्या मध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळुन आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.
4) प्रश्नाधिन जमीन हि नविन शर्तीची व भोगवटदार वर्ग- 2 ची आहे केवळ हि बाब विचारात घेऊन शासन अधिसूचना दिनांक- 08 मार्च 2019 मधील तरतुदीनुसार सदर जमिन भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत करणेस परवानगी देण्यात येत आहे.
5) सदर मिळकत बिनशेती करावयाची असल्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 44 अन्वये सक्षम अधिकारी यांचेकडून परवानगी घेणे बंधनकारक राहील.
6) नागरी जमिन ( कमाल मर्यादा धारणा विनियम ) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्यक असेल तर तशी परवानगी अर्जदार जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील.
7) महाराष्ट्र शेतजमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) कायदा 1961 मधील तरतुदिंचा भंग होऊ नये.
8) तुकडे बंदी तुकडे जोड कायदे 1947 मधिल तरतुदिंचा भंग होऊ नये.
9) श्री. धनराज पांडुरंग वटाणे रा. टिटवे ता. दिंडोरी जि. नाशिक यांची जमीन श्री. ज्ञानेश्वर चिंतामण भांगरे रा. विराणे ता. मालेगांव जि. नाशिक यांनाच विक्री करता येईल.
* श्री. ज्ञानेश्वर चिंतामण भांगरे रा. विराणे ता. मालेगांव जि. नाशिक यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36अ ला अधिन राहुन भोगवटादार वर्ग-1 म्हणुन फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करतील.
गावी मा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचेकडील आदेशाची प्रत आलेवरोन नोंद केली असे.