Ferfar #4069 · मडकीजांब
दिंडोरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा.तहसीलदार दिंडोरी यांचेकडील आदेश क्र.जमा-1/कावि/927/2026 दि.29/10/2026 अन्वये
मौजे मडकीजांब ता. दिंडोरी जि. नाशिक येथील ग.नं. 487/1, 487/2, 487/3, 535/1, 535/2, 535/3, 535/4, 535/5 व ग.नं. 548 पै. या मिळकतींबाबत मा. उपमहानगर नियोजनकार, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नाशिक यांचेकडील दि. 16/10/2026 रोजीचे पत्रान्वये औद्योगिक प्रयोजनार्थ तात्पुरता अभिन्यास अटी व शर्तीवर मंजूर केलेला असलेने प्रकरणी 7/12 उताऱ्यावर आवश्यक नोंदी घेणेबाबत कुलभुषण अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. नाशिक तर्फे संचालक विनोद कन्हैयालाल मनवाणी,सुनील बबालाल शाह यांचा अर्ज प्राप्त झाला आहे व ज्याअर्थी, कुलभुषण अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. नाशिक यांनी उक्त मिळकतींचा जागेवर औद्योगिक वापर सुरु केलेला असलेबाबत म.ज.म. अधि. 1966 चे कलम 44-अ अन्वये दि. 04/04/2025 रोजी तहसील कार्यालयास सूचना दिलेली
आहे. तथापी ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांकःएनएपी-2025/प्र.क्र. 177/जमीन-01 अ दि. 10/02/2026 अन्वये महाराष्ट्र शासनाकडील शासन निर्णयात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) 2025 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये नव्याने समाविष्ट करणेत आलेले कलम 42 नुसार संबंधित नियोजन प्राधिकरणाने एखाद्या जमिनीवर विकास परवानगी मंजूर केल्यास जिल्हाधिकारी यांचेकडून स्वतंत्र अकृषीक परवानगीची आवश्यकता नसलेबाबत नमूद केलेले आहे व ज्याअर्थी, संबंधित नियोजन प्राधिकरणाने एकरकमी रुपांतरण अधिमुल्य भरुन घेतलेनंतर विकास परवानगी मंजूर करणेबाबत व त्याअनुषंगाने संबंधित जमिनीच्या महसूल अभिलेखास त्याबाबत आवश्यक नोंदी घेणेबाबत निर्देशित असून कुलभुषण अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. नाशिक तर्फे संचालक विनोद कन्हैयालाल मनवाणी,सुनील बाबालाल शाह यांनी उक्त मिळकतींच्या विकास परवानगीबाबत एकरकमी रुपांतरण अधिमुल्य भरणा केलेबाबतचे डिफेस चलन सादर केलेले आहे.ज्याअर्थी महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांकः एनएपी-2025/प्र.क्र. 177/ जमीन-01 अ दि. 23/04/2026 चे परिपत्रकानुसार संबंधित नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी मंजूर करतेवेळी जमिन ही भोगवटादार वर्ग-1 व्यतिरिक्त अन्य धारणाधिकाराची असल्यास सदर जमिनीशी संबंधित कायदे, नियम यानुसार विहीत करणेत आलेला नजराणा भरुन घेणेकामी मा. जिल्हाधिकारी यांस अहवाल सादर करणेकामी सूचित आहे व ज्याअर्थी, मौजे मडकीजांब ता. दिंडोरी येथील उपरोक्त ग.नं. 487/1, 487/2, 487/3, 535/1, 535/2, 535/3, 535/4, 535/5 व ग.नं. 548 पै. या मिळकतींचे सन 1971 पासूनचे अभिलेख पहाता उक्त मिळकती भोगवटादार वर्ग-1 असलेचे दिसून येते.
त्याअर्थी, मौजे मडकीजांब ता. दिंडोरी जि. नाशिक येथील ग.नं. 487/1, 487/2, 487/3, 535/1, 535/2, 535/3, 535/4, 535/5 व ग.नं. 548 पै. या मिळकतींचे अभिलेखास मा. उपमहानगर नियोजनकार, नाशिक विकास प्राधिकरण नाशिक यांचेकडील मा. उपमहानगर नियोजनकार, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक NAMRDA/LT/2026/APL/00552 दि. 16/10/2026 यांचेकडील पत्र चे मंजूर तात्पुरते विकास परवानगी व मंजूर नकाशे यांचे अनुषंगाने इतर हक्कात आवश्यक नोंदी घेणे ची कार्यवाही करावी.असा आदेश प्राप्त झाल्याने तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांकःएनएपी-2025/प्र.क्र. 177/जमीन-01 अ दि.15/10/2026 नुसार ग.नं. 487/1, 487/2, 487/3, 535/1, 535/2, 535/3, 535/4, 535/5 व ग.नं. 548 पै.या मिळकतींचे 7/12 सदरी इतर हक्कात नोंद केली असे.