सातबारा Watch

← सोनगाव

Ferfar #662 · सोनगाव

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-02-16
Objection until
2026-03-05
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
दिगंबर मनोहर राऊत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/02/2026 श्रीमती मनुबाई बाबुराव लिलके राहणार- ता निफाड जि नाशिक यांनी अर्ज दिला कि,मौजे सोनगाव ता दिंडोरी जि नाशिक येथील गट नंबर 33 करिता मे. 8 वे सह. दिवाणी न्यायाधीश व.स्तर नाशिक यांचेकडील विशेष दिवाणी दावा नंबर 01/2025 नुसार आदेश झाला असून त्यानुसार नोंद घेण्यात यावी. 8 वे सह. दिवाणी न्यायाधीश व.स्तर नाशिक यांचेकडील विशेष दिवाणी दावा नंबर 01/2025 यांचेकडील आदेशानुसार सोनगाव ता दिंडोरी जि नाशिक येथील गट नंबर 33 या गटातील एकूण क्षेत्र 5.34 हे आर पैकी 9 एकर 18 गुंठे क्षेत्र वाडीच्या वडिलोपार्जित मालकीचे आहे असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच वर नमूद मिळकतीबाबत झालेली दि.11/06/1998 व दि.13/04/2010 रोजीची नोंदणीकृत खरेदीखते वादींच्या मालकीच्या 9 एकर 18 गुंठे क्षेत्रावर बंधनकारक नसून तेवढ्यापुरता रद्द करण्यात आली आहेत. त्यानुसार सदरची खरेदी खते मा सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील पत्र जा क्र. नोंदणी कक्ष-6/दस्त क्रमांक 853/1998 व 1118/2010/6483/2025, दि.11/11/2025 चे आदेशानुसार नोंद घेऊन रद्द करण्यात आली आहेत. तसेच मे. 8 वे सह. दिवाणी न्यायाधीश व.स्तर नाशिक यांचेकडील विशेष दिवाणी दावा नंबर 01/2025 कारणमिमांसा मुद्दा क्रमांक 11 नुसार कोचरगाव गट 386 (आजरोजी सोनगाव गट नंबर-33) मुळच्या स.नंबर 273/3 चे 9 एकर 18 गुंठे हे वादिच्या (अर्जदार व इतर) पूर्वजांच्या खरेदी मालकीचे असताना व वादीचे पूर्वज अमुता लिलके यांच्याकडून रामा भाडमुखे याने खरेदीपत्र केली असताना रामचा वारस दामू भाडमुखे यांचे खरेदीखात रद्द करून अमृता लिलके अगर त्यांच्या वारसांना कब्जा देण्याऐवजी तुकाराम कडाळी यांना देण्याचा व त्यांचे ना 7/12 सदरी नोंद घेण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही. अशा प्रकारे फेरफार क्रमांक 122 नुसार तुकाराम कडाळी यांच्या नावाची दावा मिळकतीच्या 7/12 सदरी झालेली नोंद 9 एकर 18 गुंठे क्षेत्रापुरती तरी चुकीची व बेकायदेशीर असल्याचे दिसून येते, असे आदेशात आहे. मे. 8 वे सह. दिवाणी न्यायाधीश व.स्तर नाशिक यांचेकडील विशेष दिवाणी दावा नंबर 01/2025 कारणमिमांसा मुद्दा क्रमांक 12 नुसार याकामी प्रतिवादीना दाव्याविषयी व दाव्यातील मागणी विषयी पुर्ण माहिती असतांना त्यांनी याकामी त्यांची कैफियत दाखल करुन अगर वादीचा उलटतपास घेवून दाव्यातील अगर वादीच्या शपचेवरील जबाबातील कथने नाकारलेलो नाहीत. तसेच दावा मिळकतीतील त्यांचा हक्क दाखविणारा कोणताही पुरावा पुढे आणलेला नाही अशा परिस्थितीत गट क्र.386 क्षेत्र 5 हे 34 आर च्या 7/12 सदरी मालक व कब्जेदार म्हणून झालेली तुकाराम कडाळी यांच्या नावाची नोंद व त्यांच्या पश्चात त्यांचे वारस म्हणून प्रतिवादीच्या नावाची झालेली नोंद पुर्णतः बेकायदेशीर असल्याचे व गट क 386 पैकी 9 एकर 18 गुंठे वादीच्या वडीलोपार्जित मालकी वहीवाटीचे असल्याचे सिध्द होते. त्यामुळे गट क 386 पैकी 9 एकर 18 गुंठे क्षेत्राबागत प्रतिवादींना खरेदी विकीचा व्यवहार करण्याचा अधिकार नव्हता नाही. त्यामुळे दावा मिळकतीबाबत झालेली दिनांक 11/06/1998 व दिनाक 13/04/2010 रोजीची खरेदीपत्रे गट क 386 पैकी 9 एकर 18 गुंठे क्षेत्रापुरती बेकायदेशीर असल्याने ती वादींवर बंधनकारक होवू शकत नाहीत त्यामुळे सदर दोन्ही खरेदीपत्रे वादींच्या मालकी हक्काच्या 9 एकर 18 गुंठे क्षेत्राबाबत रद्द होण्यास पात्र आहेत त्यामुळे सर्व मुद्दयांची उत्तरे त्या अनुषंगाने नोंदवून आदेश पारीत करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार बाजूस दाखल गट नंबर मधील दिनांक 11/06/1998 व दिनांक 13/04/2010 रोजीची खरेदीपत्र अन्यये दाखल रामचंद्र रतन गवळी व लहानू धर्मा खोटरे यांची नावे कमी करून अमृता आनंदा लिलके यांचे नाव दाखल केले असे. नोंद मे. 8 वे सह. दिवाणी न्यायाधीश व.स्तर नाशिक यांचेकडील विशेष दिवाणी दावा नंबर 01/2025 चे हुकुमनामा/आदेश, सह. दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील नोंदणी केलेले मा सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील पत्र जा क्र. नोंदणी कक्ष-6/दस्त क्रमांक 853/1998 व 1118/2010/6483/2025, दि.11/11/2025 चे आदेशानुसार नोंद घेऊन खरेदी खते रद्द करण्यात अल्याबाबतचे दि.19/11/2025 रोजीच्या पत्राची प्रत यावरून केली असे.