सातबारा Watch

← कोहोर

Ferfar #994 · कोहोर

पेठ, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
भारती सुभाष टोपले
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- काशिनाथ राजाराम पोटींदे रा. कोहोर(खाता क्रमांक26) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8370 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : देविदास तुळशीराम गाढवे , (खाता क्रमांक :-746)गट/सर्व्हे क्रमांक 35 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. पेठ जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 937 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांनी मौजे खिरकडे ता. पेठ जि.नाशिक येथील गट नं 117 7/12 उतारा शेतकरी पुरावा जोडला आहे. ज्याअर्थी, मौजे - कोहोर, ता. पेठ, जि. नाशिक येथील गट नं. ३५ चे एकूण क्षेत्र ५ हे. ६७.४० आर चौ.मी. यापैकी अर्जदार यांचे स्वतंत्र आणेवारी मालकीचे एकूण क्षेत्र ०१ हे. ८३.७० आर चौ.मी. रु 2.49 पै .ही मिळकत मिळकत श्री. काशिनाथ राजाराम पोटिंदे रा.मु.पो.कोहोर, ता. पेठ, जि.नाशिक यांचे मालकी व हिश्याची जमीन त्यांनी दि. २५/०९/२०२५ रोजी अर्ज करून त्यांचे मालकीचे विक्री क्षेत्र ०० हे. ८० आर श्री. देविदास तुळशीराम गाढवे रा. शिव रो-बंगलो, मखमलाबाद, स्वामी विवेकानंद नगर ता. जि.नाशिक यांना विक्री करण्यास परवानगी मिळावी अशी विनंती केलीआहे. प्रस्तुत जमीन खरेदी घेणार हे शेतकरी असून हिंदु-महादेव कोळी या आदिवासी जमातीचे आहेत. त्याअर्थी मी, अपर जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाव्दारे मौजे - कोहोर, ता. पेठ, जि. नाशिक गट नं. ३५ चे एकूण क्षेत्र ५ हे. ६७.४० आर चौ.मी.यापैकी अर्जदार यांचे स्वतंत्र आणेवारी मालकीचे एकूण क्षेत्र ०१ हे. ८३.७० आर चौ.मी. रु. २.४९ पै. यापैकी विक्री क्षेत्र ०० हे. ८० आर. ही मिळकत श्री. काशिनाथ राजाराम पोटिंदे रा.मु.पो.कोहोर, ता. पेठ, जि.नाशिक यांनी धारण केलेली जमीन श्री. देविदास तुळशीराम गाढवे रा. शिव रो-बंगलो, मखमलाबाद, स्वामी विवेकानंद नगर ता. जि.नाशिक यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ (२) नुसार खालील अटी व शर्तीवर अधीन राहून कृषिक प्रयोजनार्थ विक्री करणेस परवानगी देत आहे. अटी व शर्ती १. श्री. काशिनाथ राजाराम पोटिंदे रा.मु.पो.कोहोर, ता. पेठ, जि.नाशिक यांची जमीन श्री. देविदास तुळशीराम गाढवे रा. शिव रो-बंगलो, मखमलाबाद, स्वामी विवेकानंद नगर ता. जि.नाशिक यांनाच विक्री करता येईल. २. श्री. देविदास तुळशीराम गाढवे रा. शिव रो-बंगलो, मखमलाबाद, स्वामी विवेकानंद नगर ता. जि.नाशिक यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६ अ ला अधीन राहून फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी. ३. जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरून ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनु. जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, १९७४ प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील. ४. खरेदीदस्तावर सर्व जमीन मालकांची यांची स्वाक्षरी घेण्यात यावी. ५. जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा (१५) दिवसानंतर तीन (०३) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. ६. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहील. ७. सदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील. ८. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही. ९. सदर जमिनीचे मूल्यांकनाची रक्कम रु.२,००,०००/- ही असून साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु.४,९५,०००/- एवढी आहे. साठेखतातील व्यवहाराच्या रक्कमेपेक्षा मूल्यांकनाची रक्कम जास्त असल्याने मूल्यांकनाची रक्कम ही जमिनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे रक्कम रु.४,९५,०००/- (अक्षरी चार लाख पंच्याण्णव हजार मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व या बाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा झाल्याबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये. १०. प्रस्तुत मिळकती संबंधित भुधारकाचे एकूण क्षेत्र व लागू असलेला स्लॅब विचारात घेवून निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नवीन भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नवीन भुधारकाचे एकूण क्षेत्र लागू असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नवीन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमूद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील. ११. तहसीलदार पेठ / ग्राम महसूल अधिकारी कोहोर यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडून धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये. १२. प्रश्नाधिन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसूली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांच्यावर बंधनकारक राहील. १३. प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निर्बंध लागू राहतील. १४. अ) महाराष्ट्र शेतजमीन ( ज.धा.क.म ) -१९६१ १५. ब) महाराष्ट्र कुळ वहीवाट व शेत जमीन अधिनियम -१९४८ १६. ड) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळवहीवाट विधी (सुधारणा) अधिनियम-१९७४ (१९७४/३५) १७. ई) सदरची परवानगी फक्त याच कायद्यांतर्गत देण्यात आली आहे. या संबंधींत नागरी जमिन (कमाल) मर्यादा विनियमन) अधिनियम-१९६६ किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार व नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांच्यावर बंधनकारक राहील. १८. वरीलपैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अती निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास व शास्तीस पात्र राहील.