सातबारा Watch

← वेळूंजे

Ferfar #3130 · वेळूंजे

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
रोहिणी निवृत्ती मोंढे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.मशा/कक्ष/3/2/न.अ.भोग-15/एसआर-16/2026-27, नाशिक आदेश दिनांक : 15/10/2026 माननीय अपर जिल्हाधिकारी, नाशिक आदेशाद्वारे क्र.मशा/कक्ष/3/2/न.अ.भोग-15/एसआर-16/2026-27, नाशिक, दिनांक 15/10/2026 यांचे आदेशानुसार अर्जदार जमीन मालक श्री. नानासाहेब नामदेव काशिद व श्रीम. नर्मदा नामदेव काशिद रा. मु.पो. वेळूजे ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक यांनी मौजे वेळूजे ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील ग.न. 247 चे क्षेत्र 1.70.30 हे. आर + पो.ख. क्षेत्र 0.05 हे. आर एकूण क्षेत्र 1.75.30 हे. आर आकार रु. 2.03 पैसे पैकी अर्जदार (1) नानासाहेब नामदेव काशिद यांचे स्वतंत्र आणेवारीनुसार क्षेत्र 0.45.10 हे.आर + पो.ख. 0.02 हे. आर असे एकूण 0.47.10 हे. आर आकार 00 रु. 54 पै. व अर्जदार 2) नर्मदाबाई नामदेव काशिद यांचे स्वंतत्र आणेवारी नुसार क्षेत्र 00.40 हे. आर आकार 00 रु. 48 पै. असे दोन्ही मिळून एकत्रित क्षेत्र 00.87.10 हे. आर ही जमीन नविन शर्तीवर धारण केलेली मिळकत भोगवटदार वर्ग-2 मधुन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेस खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात येत आहे. सदर अटी व शर्तीची अधिकार अभिलेखात नोंद घेण्यात यावी. 1) श्री. नानासाहेब नामदेव काशिद व श्रीम.नर्मदा नामदेव काशिद रा. मु.पो. वेळूजे ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक हे सदरची जमिन भोगवटदार वर्ग-1 म्हणुन धारण करतील. 2) भविष्यात लेखापरिक्षणात नजराणा कमी भरणा झाला असलेबाबत शक निघाल्यास फरकाची रक्कम भरणा करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील यांस अधिन राहुन परवानगी देण्यात येत आहे. 3 ) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार जमिन मालक यांनी प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्या मध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळून आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील. 4) प्रश्नाधिन जमीन ही नविन शर्तीची व भोगवटदार वर्ग-2 ची आहे केवळ ही बाब विचारात घेऊन शासन अधिसूचना दिनांक. 08/03/2019 व सुधारित शासन अधिसूचना दिनांक 04/03/2025 मधील तरतुदीनुसार सदर जमीन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेस परवानगी देण्यात येत आहे. 5) सदर मिळकत बिनशैती करावयाची असल्यास महाराष्ट्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 44 अन्वये सक्षम अधिकारी यांचेकडून परवानगी घेणे बंधनकारक राहील. 6) नागरी जमिन (कमाल मर्यादा घारणा विनियम) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्यक असेल तर तशी परवानगी अर्जदार जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील. 7) महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) कायदा 1961 मधील तरतुदींचा भंग होवु नये. 8) तुकडे बंदी तुकडे जोड अधिनियम 1947 मधील तरतुर्वांचा भंग होवु नये. हा आदेश महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड-2 चे परिपत्रक क्र.3 मधील परिच्छेद 78 व शासन निर्णय क्रमांकः जमीन/-2022/प्र.क्र.106/ज-1 दिनांक 05 जुलै, 2023 तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अधिसूचना क्रमांक. जमीन/2016/सीआर-82/ज-1 दि. 31 मार्च 2016, तसेच शासन राजपत्र अधिसूचना दि.08/03/2019 व सुधारित अधिसूचना दि. 04/03/2025 नुसार प्राप्त अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे