सातबारा Watch

← त्र्यंबकेश्वर (शहर)

Ferfar #6068 · त्र्यंबकेश्वर (शहर)

त्रिंबक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
90/2
Talathi
मनोज देविदास मोरे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- कुमार जगन्नाथ उजे रा. त्र्यंबकेश्वर (शहर)(खाता क्रमांक4309) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सोनाली किरण चिंचोरे , (खाता क्रमांक :-4968)गट/सर्व्हे क्रमांक 90/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर मिळकत आदिवाशींची मिळकत असल्याने व खरेदी घेणार हे बिगर अदिवशी असल्याने मा.अप्पर जिल्हाधिकारी सो नाशिक यांच्या कडील आदेश क्र.कक्ष-4/कु.का.5/एस.आर-58/2025 नाशिक दिनांक 01/10/2026 अन्वये खालील अटी व शर्तीवर परवानगी घेण्यात आली आहे. 1) सदर जमिनीचा शैक्षणिक या अकृषिक प्रयोजनासाठी वापर करावा. 2) सदर जमिनीचा अकृषिक वापरासाठी विकास करण्यापूर्वी महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचनाअधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार संबंधित सर्व सक्षम अधिका-यांकडून योग्य त्या परवानग्या घ्याव्यात. 3 ) सदर जमीनीचे विक्री हस्तांतरणास आदिवासी खातेदाराची व त्यांच्या सर्व वारसांची संमती असल्याबाबत तहसीलदार त्र्यंबकेश्वर यांनी पुन्हा खात्री करुन घ्यावी. 4) सदर आदेशाच्या दिनांकापासुन तीन (03) महिन्याच्या आत खरेदी व्यवहार पूर्ण करावा. तसेच जमीन खरेदी केल्यानंतर जमीन खरेदी करणार यांना तीन महिन्यात प्रस्तावित अभिन्यास / परवानग्या मंजूर करुन घेवून पुढील सहा महिन्याच्या आत प्रस्तावित बिनशेती विकास काम सुरु करणे आवश्यक राहील व नियोजित पूर्ण वापर पाच वर्षांचे आत करणे बंधनकारक राहील. नमुद प्रयोजनासाठी विकास केल्याशिवाय या क्षेत्राची फेर विक्री करता येणार नाही. सदर जमिनीचा पाच वर्षांचे आत मंजुर प्रयोजनासाठी वापर न केल्यास पाच वर्षानंतर सदर जमिनीचे शिघ्रसिध्द गणकानुसार येणारे अकृषिक मुल्यांकन निश्चित करून सदर मुल्यांकनातून सदर जमिन ज्या किंमतीस विक्री करण्यात आली होती ती किंमत वजा करून येणा-या फरकाची रक्कम मूळ आदिवासी जमीन धारकाच्या बँक खात्यात तहसीलदार यांचे समक्ष जमा करणे बंधनकारक राहिल. सदर रक्कम बँक खात्यात जमा झाल्यानंतरच सदर जमिनीच्या मंजुर प्रयोजनासाठीच वापरास मुदतवाढ देण्याबाबत प्रकरणाची गुणवत्ता विचारात घेवून करणेत निर्णय घेण्यात येईल. फरकाची रक्कम आदिवासी जमीन धारकांच्या नावे जमा करण्यास बिगर आदिवासी खरेदीदाराने कसुर केल्यास फरकाच्या रकमेचा बोजा सदर जमिनीच्या 7/12 सदरी इतर अधिकारात नोंदविण्यात येईल. सदर जमिनीचा वापर मंजुर प्रयोजनासाठी होतो किंवा नाही याबाबत वेगळी देखरेख नोंदवही (Watch Register) तहसीलदार यांनी ठेवावी व आदिवासी जमिन विक्री परवानगीच्या अनुषंगाने वापर होतो किंवा नाही याबाबत वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन पर्यवेक्षण करावे. 5) सदर मिळकतीचे सह. दुय्यम निबंधक त्र्यंबकेश्वर यांचेकडील शिप्रसिद्ध गणकानुसार मुल्यांकन रु.29,67,000/- ही मिळकतीची किंमत आहे. व साठेखतानुसार रु.17,00,000/- इतकी रक्कम आहे. साठेखतातील व्यवहाराच्या रक्कमेपेक्षा मुल्यांकनाची रक्कम अधिक असल्याने मुल्यांकनाची रक्कम रुपये 29,67,000/- ही जमिनीची खरेदी किंमत म्हणुन निश्चित करण्यात येत आहे. सदर रक्कम जमिन मालक यांचे नावे धनादेशाद्वारे राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व बँकेचे खात्यावर रक्कम झालेबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे, त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त व्यवहार नोंदणीकृत करु नये. 6) आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम वजा जाता त्याबाबत संबंधित तहसिलदार यांनी खात्री करून उर्वरित निश्चित मुल्यांकनाची रक्कम आदिवासी खातेदार, त्यांची पत्नी व त्यांच्यावर अवलंबून असलेली मुले-मुली यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत संयुक्त खाते उघडून त्यांचे समक्ष धनादेशाद्वारे रक्कम अदा केल्याची खात्री करावी. 7) सदर जमिनीचा विकास संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेच्या अधिन राहील, सदरील जमिनीच्या विकासाचा आराखडा संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडून मंजूर करून घेणे खरेदीदार यांच्यावर बंधनकारक राहील. 8) सदर जमिनीची ज्या प्रयोजनासाठी खरेदी करत आहेत त्या प्रयोजनाची 7/12 अभिलेखात स्पष्ट नोंद घेण्यात यावी तसेच सदर जमीन ज्या प्रयोजनासाठी खरेदी करण्यात येत आहे. त्या प्रयोजनासाठी वापर करणे बंधनकारक राहील अशी नोंद 7/12 उताऱ्यावर इतर हक्कात घेण्यात यावी. 9) सदर मिळकतीचा खरेदी-विक्री दस्त तीन (03) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. 10) सदर जमिनीची ज्या कारणासाठी खरेदी करत आहे त्या प्रयोजनाची व त्याच प्रयोजनासाठी वापर करणे बंधनकारक राहिल अशी नोंद 7/12 उता-यावर घेण्यात यावी तसेच खरेदीदाराने या प्रकरणी आदिवासी खातेदारांची फसवणुक / लुबाडणुक पिळवणुक केल्याचे निदर्शनास आल्यास बिगर आदिवासी हा अनुसुचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 अन्वये कारवाईस पात्र राहील. 11) अर्जदार यांना ज्या प्रयोजनासाठी विक्री परवानगी देण्यात आलेली आहे त्याच प्रयोजनासाठी अकृषिक परवानगी घेतली असल्याची तहसीलदार यांनी खात्री करावी. 12) सदर मिळकतीचा मंजूर प्रयोजना व्यतिरिक्त वापर करावयाचा असल्यास शासनाची व इकडील कार्यालयाची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहोल. 13) सदर जमिनीच्या खरेदीमुळे खरेदीदार यांना शेतकरी दर्जा प्राप्त होणार नाही, अशी नोंद 7/12 उताऱ्यावर इतर हक्कात घेण्यात यावा. 14) तहसीलदार त्र्यंबकेश्वर / ग्राम महसूल अधिकारी त्र्यंबकेश्वर (शहर) यांनी शासन ज्ञापनातील अटी व शर्ती प्रमाणे पुर्तता होत असल्याची खात्री करावी. तदनंतरच अधिकार अभिलेखात अंमल घेणेची कार्यवाही करावी. 15) 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील आदिवासी जमिन हा शेरा जमीन घेणार यांचे क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा. जमीन घेणार यांनी जमिनीचा वापर शैक्षणिक या अकृषिक प्रयोजनासाठी सुरु केल्याशिवाय हस्तांतर करता येणार नाही. 16) सदर गटात भूसंपादन झाले असल्यास भूसंपादित क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील. 17) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-1966 सह प्रचलित इतर सर्व जमिन विषयक कायद्यातील तरतुदी सदरच्या विक्री व्यवहाराला लागु राहतील. 18) सदर मिळकतीच्या मालकी हक्काबाबत कोणत्याही महसूली अथवा दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित असल्यास, संबंधित न्यायालयाकडून पारीत होणारे आदेश मिळकतीचे हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहतील. 19) सदरील जमिनीच्या विक्रीने हस्तांतरणासंदर्भात भविष्यात कोणताही वाद उत्पन्न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विक्रीकर्ते व खरेदीदार यांच्यावर राहील. 20) प्रस्तुत जमीनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी प्रकरणी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र / कागदपत्र यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास वा खोटो माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास व संबंधित व्यक्ती फौजदार कारवाईस पात्र राहील. 21) सदर जमीनीबाबत कोणताही दावा न्यायप्रविष्ठ नाही याबाबत तहसीलदार यांनी खात्री करुन घ्यावी. 22) शासनाकडील दिनांक 23 एप्रिल 2026 रोजीचे ज्ञापनामधील अट क्र. 23 नुसार तालुक्यातील जनजातीच्या व्यक्तींचा एखादा संघ किंवा तत्सम अन्य संघटना असल्यास यांना नमुना अ मधील नोटीस ही बजावणी केल्याबाबतची खात्री करण्याच्या अधिन राहुन सदर मंजुरी देण्यात येत आहे. वरीलपैकी कोणत्याही तसेच शासन ज्ञापन दि. 23 एप्रिल 2026 मधील अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती तसे निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील. यांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2486 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2967000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. इतर अधिकारातील समाविष्ट केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 90/2, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार : ,इतर अधिकाराचा तपशील : सदर जमिन शैक्षणिक या अकृषिक प्रयोजनासाठी खरेदी केली व त्या प्रयोजनासाठी वापर करणे बंधनकारक राहील. सर्व्हे क्रमांक: 90/2, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार : ,इतर अधिकाराचा तपशील : सदर जमिनीच्या खरेदीमुळे खरेदीदार यांना शेतकरी दर्जा प्राप्त होणार नाही.