Ferfar #1101 · देवगांव
त्रिंबक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- किरण अशोक पवार
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
सक्रु सोमा दोरे रा. देवगांव(खाता क्रमांक1411) यांचे गट/सर्व्हे क्रमांक233, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सचिन कृष्णा दाभाडे , (खाता क्रमांक :-1415)गट/सर्व्हे क्रमांक 233 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2479 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
खरेदी देणार आदिवासी असून सदर व्यवहारासाठी मा.अपर जिल्हाधिकारी सो.यांचेकडील आदेश क्र.कक्ष-4/कु.का.4/एस.आर.-406 /2026 नाशिक दि.11/09 /2026 अन्वये पुढील अटी व शर्ती यांना अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.
अटी व शर्ती
1. श्री. सक्रु सोमा दोरे, रा. रायापाडा, ता.त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक यांनी धारण केलेली श्री. सचिन कृष्णा दाभाडे, रा. 21. न्यु गणेश कॉलनी, मु. पो. ता शिरपुर, जि. धुळे यांनाच विक्री करता येईल.
2. श्री. सचिन कृष्णा दाभाडे, रा. 21, न्यु गणेश कॉलनी, मु. पो. ता शिरपुर, जि. धुळे यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधिन राहून फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी.
3. जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरुन ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनुः जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील.
4. खरेदीदस्तावर धारक / सहधारक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी.
5. जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा (15) दिवसानंतर तीन (03) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.
6. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहील,
7. सदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील.
8. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही.
9. सदर जमीनीचे साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु.5,00,000/- ही असून मुल्यांकनाची रक्कम रु.2,19,109/-एवढी आहे. मुल्यांकनाच्या रक्कमेपेक्षा साठेखतातील व्यवहाराची रक्कम जास्त असल्याने ती जमीनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे रक्कम रु.5,00,000/- (अक्षरी रक्कम पाच लाख रुपये मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व या बाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा झालेबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्याशिवाय सह. दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये.
10. प्रस्तुत मिळकती संबंधित भूधारकाचे एकूण क्षेत्र व लागू असलेला स्लॅब विचारात घेवून निश्चित केलेले संपादन पात्र भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नवीन भुधारकाचे एकूण क्षेत्र लागू असलेल्या स्लॅब क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नवीन पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना बेल्ली शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नवीन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमुद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील.
11. प्रश्नाधीन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील
12. तहसीलदार त्र्यंबकेश्वर / ग्राम महसूल अधिकारी. देवगांव यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडून धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये.
13. प्रस्तावित व्यवहारात खालील कायदयाचे निबंध लागु राहतील.
अ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म)-1961
ब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम-1948
ड) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम-1974 (1974/35)
ई) सदरची परवानगी फक्त याच कायदयातंर्गत देण्यात आली आहे. या संबंधीत नागरी जमिन (कमाल) मा कोणत्याही कायदयानुसार व नियमानुसार परवानगी तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
वरीलपैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व कशा अंती निष्पन झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील. खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे पहिने , ता. त्र्यंबकेश्वर , जि. नाशिक चा गट क्रमांक 204 चा 7/12 उतारा जोडला आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले आहे. नोंद अर्ज, सूची क्र 2, खरेदीखताची छायांकित प्रत वरोन केली असे