सातबारा Watch

← धोंडेगांव

Ferfar #2299 · धोंडेगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
250, 251/1, 252, 253, 255
Talathi
गणेश खंडु जोपळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जमा-3 कावि 780 2026 आदेश दिनांक : 23/07/2026 मा .सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका सिव्हील क्र ११६४/२०२३ प्रकरणी न्यायालयाने दि १९/0२/२०२४ व दि ०४/०३/२०२५ च्या आदेशाची अंमलबजावणी करणे कामी महसूल व वनविभागाच्या शासन निर्णय क्रमांक एस-१०/२०२४/प्र.क्र. १३२/फ-३ दिनाक.१० जून २०२५ अन्वये तज्ञ समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर गठीत झालेल्या जिल्हास्तरीय समितीचा बैठक मा.जिल्हाधिकारी नाशिक यांचे अध्यक्षते खाली दिनाक 22/०९/२०२५ रोजी घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने सदर बैठकीत दिलेल्या सूचना प्रमाणे मा.सर्वोच्च न्यायलय रिट याचिका क्र ३०१/२००८ मधील आय.ए.क्र.२५४९४६/२०२३ व आय.ए.क्र.१९०८/२०२४ [मे. रिची रिच हौसिंग सोसायटी ]मध्ये दिनाक १५.०५.२०२५ रोजी पारित केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने राज्यात महसूल विभाग तसेच अन्य विभागाच्या अधिपत्याखालील/ताब्यातील राखीव संरक्षित वन क्षेत्राबाबत आढावा घेण्यासाठी तसेच विविध प्रयोजनासाठी खाजगी व्यक्ती किंवा संस्थाना वाटप वनक्षेत्राबाबत चौकशी करण्यासाठी तालुकास्तरीय उप-समिती गठीत करण्यात आलेली आहे. तरी संदर्भीय पत्रामध्ये नमूद केले प्रमाणे वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख/ गाव नमुना नं ७/१२ मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना दिलेले आहेत. तरी दिलेल्या सुचने प्रमाणे वनक्षेत्राच्या शासन निर्णयानुसार शासन परिपत्रक क्र एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३[फ-३] दिनाक २३/०४/२०२६ प्रमाणे वन विभागाच्या ताब्यातील व महसूल विभागाच्या ताब्यातील गटातील वनक्षेत्राचे इतर अधिकारात ‘भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी’ हा शेरा दाखल केला असून दप्तरी नोंद घेतली आहे.