Ferfar #4824 · दुगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 311
- Talathi
- प्रिया चंदर चौधरी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक.
आदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस./कावि/367/2026 नाशिक
आदेश दिनांक : 14/10/2026.
लिहुन देणार :- सिराज अब्दीअली मुन
लिहुन घेणार :- दिपाली गणेश गिते
बाजूस दाखल मिळकतीचे धारक सिराज अब्दीअली मुन यांनी विषयांकित मिळकत मधील क्षेत्र हे दिनांक 28/07/2026 रोजी मा.सह.दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक 1 यांचे कडेस दस्त क्रमांक 7208/2026 अन्वये मोबदला रक्कम रुपये 15,00,000 घेऊन मिळकत खरेदी घेणार दिपाली गणेश गिते यांना कायमचे खरेदी अन्वये दिली. व गावी मा.सह.दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक 1 यांचे कडून फेरफार क्रमांक 4785 ही संगणकीय प्रणालीने इकडील कार्यालयास प्राप्त झाली. परंतु सदर फेरफाराचे मुदतीअंती फेरफारातील सर्व हितसंबधीतांना फेरफारा मधील कलम 150 (2) नुसार नमुना नऊ नोटीस बजावणी झालेली नसल्याने सदरची फेरफार नामंजूर करण्यात आली. त्यामुळे मा.मंडळ अधिकारी गिरणारे यांचे निर्णयावर व्यथित होऊन मिळकत खरेदी घेणार दिपाली गणेश गिते यांनी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांचे कार्यालयात अपिल दाखल केलेले होते. त्या अनुषंगाने मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांनी अर्जदार यांचा अपिल अर्ज मान्य करून दिनांक 14/10/2026 रोजी “ आदेश क्र.आर.टी.एस./कावि/367/2026 नाशिक दिनांक 14/10/2026 रोजी गावी मंडळ अधिकारी गिरणारे यांचे दिनांक 28/08/2026 रोजीचे फेरफार क्रमांक 4785 नोंद नामंजुरीचे आदेश रद्द करून सदर फेरफार नोंदी बाबत गुणवत्तेवर विहित मुदतीत आदेश पारित करून गावी दस्ता नुसार अधिकार अभिलेखाचे नियमानुसार फेरफार नोंद घेणे बाबतची तात्काळ कार्यवाही करणे बाबत आदेश पारित केलेले आहेत. सबब गावी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांचे कडील हे फेरनोंद घेणे बाबतचे “ आदेश क्र.आर.टी.एस./कावि/367/2026 नाशिक दिनांक 14/10/2026 प्राप्त झालेने मिळकत लिहून घेणार यांचे नाव 7/12 सदरी दाखल करणे कामी आदेशावरोन नोंद केली असे.