सातबारा Watch

← दुगांव

Ferfar #4826 · दुगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2
Talathi
प्रिया चंदर चौधरी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दाखल मिळकतीचे धारक नामे गोरख जयराम थेटे रा. दुगाव यांनी दिनांक 17/07/2026 रोजी मा.तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय नाशिक यांचेकडे विनंती अर्ज देऊन मौजे दुगाव ता.जि. नाशिक येथील ग. नं. 13/2 या 7/12 मिळकतीचे अभिलेख सदरी गावी महाराष्ट्र शासन राजपत्रान्वये दुरुस्ती करून गोरक्षनाथ जयराम थेटे ऐवजी गोरख जयराम थेटे तसे दुरुस्त नाव दाखल होणे कामी आदेश होणे बाबत विनंती केली आहे. त्या अनुषंगाने मा.तहसीलदार साहेब, तहसिल कार्यालय नाशिक यांनी प्रस्तुत प्रकरणातील संबधित अर्जदार यांनी प्रकरणी सादर केलेले आवश्यक कागदपत्र, व महाराष्ट्र शासन राजपत्राचे अवलोकन करता दिनांक 05/08/2026 रोजी क्र.अधि.अभि./कावि/747/2026 दिनांक 05/08/2026 अन्वये दोन्ही नावाची व्यक्ती एकच असले बाबत खात्री करून व आवश्यक ती पडताळणी करूनच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 अन्वये गावी नियमोचीत कार्यवाही करणे बाबत सूचित केलेले आहे. सबब गावी मा. तहसीलदार साहेब, तहसिल कार्यालय नाशिक यांचे कडील पत्र क्र.अधि.अभि./कावि/747/2026 नाशिक. दिनांक 05/08/2026 व महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. RNI No. MAHBIL/2009/31874 हे इकडील कार्यालयास प्राप्त झालेने 7/12 सदरी दाखल अर्जदार यांचे नाव गोरक्षनाथ जयराम थेटे ऐवजी गोरख जयराम थेटे असे दुरुस्त नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.