सातबारा Watch

← ओझरखेड

Ferfar #1368 · ओझरखेड

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
67/2
Talathi
अनिता काशिनाथ जगताप
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- श्रीधर सोनु खराटे रा. ओझरखेड(खाता क्रमांक317) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दत्तू बबन गुंबाडे ,स्वाती दत्तू गुंबाडे - - -, (खाता क्रमांक :-490)गट/सर्व्हे क्रमांक 67/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9241/2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1056000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर मिळकतीत मा. अप्पर जिल्हाधिकारी नाशिक , जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचे कडील आदेश क्रमांक:- क्र. कक्ष-4/कु.का.-4/एस.आर./793/2025 दिनांक:- 20 /08 /2026 आदेशाने अटी व सर्तीना अधीन राहून विक्री करणेस परवानगी देण्यात आली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ज्याअर्थी मौजे ओझरखेड ता. जि. नाशिक येथील गट नं. 67/2 चे एकूण क्षेत्र। हे. 11 आर, आकार रु. 3.87 पै. यापैकी अर्जदार यांचे स्वतंत्र आणेवारी व माल‌कीचे क्षेत्र 1 हे. 08 आर, आकार रु. 3.77 पै. यापैकी विक्री क्षेत्र 0 हे. 40 आर ही मिळकत श्री. श्रीधर सोनु खराटे यांचे मालकी व हिश्याची जमीन आहे. त्यांनी दि.04/12/2025 रोजीचे अर्ज सादर करुन त्यांचे मालकीचे क्षेत्रापैकी विक्री क्षेत्र 0 हे. 40 आर है श्री. दत्तु बबन गुंबाडे व सौ. स्वाती दत्तु गुंबाडे यांना विक्री करणेस परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे. प्रस्तुत जमीन खरेदी घेणार हे शेतकरी असून हिंदु- कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहेत. त्याअर्थी मी, अपर जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे माजे ओझरखेड ता. जि. नाशिक येथील गट नं. 67/2 चे एकुण क्षेत्र 1 हे. 11 आर, आकार रु. 3.87 ये. यापैकी अर्जदार यांचे स्वतंत्र आणेवारी व मालकीचे क्षेत्र 1 हे. 08 आर, आकार रु. 3.77 पै. यापैकी विक्री क्षेत्र 0 हे. 40 आर ही मिळकत श्री. श्रीधर सोनु खराटे यांनी धारण केलेली जमीन श्री. दत्तु बबन गुंबाडे व सौ. स्वाती दत्तु गुंबाडे यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36(2) नुसार खालील अटी व शर्तीवर अधीन राहून कृषिक प्रयोजनार्थ विक्री करणेस परवानगी देत आहे. अटी व शर्ती 1 श्री. श्रीधर सोनू खराटे यांची जमीन श्री. दत्तु बबन गुबार्ड व सौ. स्वाती दत्तु 2. श्री. दत्तु बबन गुबार्ड व सौ. स्वाती दत्तु गुबाडे यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अला अधिन राहुन फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी. 2. श्री. दत्तु बबन गुबार्ड व सौ. स्वाती दत्तु गुबाडे यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अला अधिन राहुन फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी. 3. जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरुन ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनुः जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील. 4. खरेदीदस्तावर धारक / सहधारक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी. 5. जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा (15) दिवसानंतर तीन (03) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. 6. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहील. 7. सदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील. 8. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही. 9. सदर जमीनीचे साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु.10,56,000/- ही असून मुल्यांकनाची रक्कम रु.10,56,000/- एवढी आहे. मुल्यांकनाची रक्कम व साठेखतातील व्यवहाराची रक्कम एकसमान असल्याने मुल्यांकनाची रक्कम ही जमीनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे रक्कम रू. 10,56,000/- (अक्षरी रक्कम - दहा लाख छप्पन्न हजार रुपये मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व या बाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा झालेबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्याशिवाय सह. दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये. प्रस्तुत मिळकती संबंधित भुधारकाचे एकुण क्षेत्र व लागु असलेला स्लॅब विचारात घेवुन निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नवीन भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नवीन भुधारकाचे एकुण क्षेत्र लागु असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नवीन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमुद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील. 11. प्रश्नाधीन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसुली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील. 12. तहसीलदार नाशिक / ग्राम महसूल अधिकारी, ओझरखेड यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडुन धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये. 13. सौ. मिना बाळु गभाले यांच्या हिश्श्याकरीता क्षेत्र 0 हे. 03 आर "विहीरीच्या वापराकरीता मर्यादीत" अशी नोंद इतर अधिकारात घेण्यात यावी. 14. प्रस्तावित व्यवहारात खालील कायदयाचे निर्बंध लागु राहतील. अ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म)-1961 ब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम-1948 ड) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम-1974 (1974/35) ई) सदरची परवानगी फक्त याच कायद्यातर्गत देण्यात आली आहे. या संबंधीत नागरी जमिन (कमाल) मर्यादा विनियमन) अधिनियम-1966 किंवा अन्य कोणत्याही कायदयानुसार व नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. वरीलपैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती निष्पन झाल्यास सदरची परवानगीरद्द होणेस व शास्तीस पात्र राहील.