Ferfar #1463 · गणेशगांव (नाशिक)
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/ब
- Talathi
- चपालाल सुरेश चव्हाण
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बाजूस दाखल केलेला गट नंबर हा श्री. भिमा बापू कापसे यांच्या नावावर असून त्यांनी सदर जमिनीचे आपल्या मुलांमध्ये वाटप करणेकामी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम, 1966 चे कलम 85 प्रमाणे परवानगी अर्ज सादर केला आहे. त्यानुसार मा. तहसीलदार सो. नाशिक, ता. जि. नाशिक यांनी खालील अटी व शर्तीवर सदर शेतजमीन वाटपास परवानगी दिली आहे.
वाटपा पूर्वीचा जमिनीचा तपशील:-
भूमापन क्रमांक क्षेत्र (हे.आर.चौ.मी.) पोट खराब (हे.आर.चौ.मी.) आकार (रु.पै.) दाखल असलेले नाव
101/ब 3.6400 0.1250 3.59 भिमा बापू कापसे
वाटपानंतरचा जमिनीचा तपशिल:-
भूमापन क्रमांक क्षेत्र (हे.आर.चौ.मी.) पोट खराब (हे.आर.चौ.मी.) आकार (रु.पै.) दाखल करावयाचे नाव
101/ब 1.8200 0.0625 1.79 गोपाळ भिमराव कापसे (पूर्वेकडील बाजूचे क्षेत्र)
101/ब 1.8200 0.0625 1.80 विठोबा भिमराव कापसे(पश्चिमेकडील बाजूचे क्षेत्र)
सदर आदेशातील अटी व शर्ती खालीलप्रमाणे:-
1) जमीन ज्या शर्ती व ज्या वर्गातील मूळ जमीन असेल त्याच शर्तीवर वर्गात वाटप केलेली जमीन राहील.
2) शेतसारा संबंधित शेतजमीन धारकाने भरावा. वाटपाप्रमाणे वाटपात असलेल्या शेतजमिनीवर इतर हक्कामध्ये जे जे हक्क, बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व शेतजमिनी बरोबर संबंधित शेतजमीन धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकांवर राहील.
3) वरील गट नंबरचे विभाजन करता कामा नये. शेतजमिनीची वहिवाट एकत्रित व्हावयास पाहिजे. परवानगी सिलिंग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही व या अटीवर वाटपास परवानगी देण्यात आलेली आहे.
4) वाटपामुळे विस्थापित/भूमिहीन झाल्यास शासनाकडे जमिनीची मागणी करणार नाही.
5) वाटपामुळे विस्थापित/भूमिहीन झाल्यास, अगर अल्पभूधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.
6) मुंबई तुकडे प्रतिबंध व जमीन अधिनियम कायदा 1947 चे कायद्यातील तरतुदी लागू, प्रमाणभूत क्षेत्राशिवाय वाटप असल्यास केवळ आणेवारी दर्शविणारी राहील.
7) वाटपास महाराष्ट्र शेत जमीन (कमाल मर्यादा) अधिनियम 1961 मधील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.
8) जमिनीचे इतर हक्कातील जे काही हितसंबध असतील ते कायम राहतील.
9) जमिनीचे विभाजन करावयाचे असल्यास संबधित मोजणी प्राधिकारी यांचेकडे पोट हिस्सा मोजणी फी भरून पोटहिस्सा मोजणी करून घेणे बंधनकारक राहील व त्याची जबाबदारी नवीन धारकांवर राहील.
सदर अटी व शर्तीवर मा. तहसीलदार सो. नाशिक यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 85 नुसार सदर वाटपास परवानगी दिलेली आहे. सदर नोंद मा. तहसीलदार, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/एसआर/वाटप/1095/2026, नाशिक आदेश दिनांक 02/11/2026 यांच्या वरून केली असे.