सातबारा Watch

← मनोली

Ferfar #717 · मनोली

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
49/1/अ/2
Talathi
प्रिया चंदर चौधरी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक. आदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस./कावि/238/2026 नाशिक आदेश दिनांक : 04/08/2026. मौजे मनोली येथील खातेदार ताराबाई शिवलाल घोडे ह्या दि.25/06/2025 रोजी मयत झाल्या असून त्यांनी मृत्यूपूर्वी दि. 14/02/2022 रोजी दु.नि.नाशिक 1 दस्त क्र.1378/2022 अन्वये मृत्युपत्र बनवले आहे. तथापी त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत. 1) गोरख शिवलाल घोडे वय वर्ष 46 नाते मुलगा 2) मच्छिंद्र शिवलाल घोडे वय वर्ष 43 नाते मुलगा 3) लीलाबाई शिवाजी धोंगडे वय वर्ष 60 नाते मुलगी 4) मीरा रामदास शेळके वय वर्ष 57 नाते मुलगी 5) उषा सुदाम भावले वय वर्ष 53 नाते मुलगी येणे प्रमाणे मयतास वारस आहेत. परंतु मयत ताराबाई शिवलाल घोडे यांनी विषयांकित मिळकत मधील क्षेत्र हे दिनांक 14/02/2022 रोजी मा.सह.दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक 1 यांचे कडेस दस्त क्रमांक 1378/2022 अन्वये त्यांचे असणारे वारसापैकी 2 मुले 1) गोरख शिवलाल घोडे यांना एकूण क्षेत्रापैकी 0.49 हे.आर व 2) मच्छिंद्र शिवलाल घोडे यांना एकूण क्षेत्रापैकी 0.50 हे.आर हे कायमचे मृत्यूपत्र अन्वये दिली. व गावी मा.सह.दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक 1 यांचे कडील मृत्यूपत्र इकडील कार्यालयास सादर केल्याने गावी फेरफार क्रमांक 712 ही संगणकीय प्रणालीने इकडील कार्यालयास दाखल करण्यात आली. परंतु सदर फेरफाराचे मुदतीअंती फेरफारातील सर्व हितसंबधीतांना फेरफारा मधील कलम 150 (2) नुसार नमुना नऊ नोटीस बजावणी झालेली नसल्याने सदरची फेरफार नामंजूर करण्यात आली. त्यामुळे मा.मंडळ अधिकारी गिरणारे यांचे निर्णयावर व्यथित होऊन मिळकत लिहून घेणार 1) गोरख शिवलाल घोडे. 2) मच्छिंद्र शिवलाल घोडे यांनी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांचे कार्यालयात अपिल दाखल केलेले होते. त्या अनुषंगाने मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांनी अर्जदार यांचा अपिल अर्ज मान्य करून दिनांक 04/08/2026.. रोजी “ आदेश क्र.आर.टी.एस./कावि/238/2026 नाशिक दिनांक 04/08/2026.रोजी गावी मंडळ अधिकारी गिरणारे यांचे दिनांक 06/07/2026 रोजीचे फेरफार क्रमांक 712 नोंद नामंजुरीचे आदेश रद्द करून सदर फेरफार नोंदी बाबत गुणवत्तेवर विहित मुदतीत आदेश पारित करून गावी दस्ता नुसार अधिकार अभिलेखाचे नियमानुसार फेरफार नोंद घेणे बाबतची तात्काळ कार्यवाही करणे बाबत आदेश पारित केलेले आहेत. सबब गावी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांचे कडील हे फेरनोंद घेणे बाबतचे “ आदेश क्र.आर.टी.एस./कावि/238/2026 नाशिक दिनांक 04/08/2026 प्राप्त झालेने मिळकत लिहून घेणार यांचे नाव 7/12 सदरी दाखल करणे कामी आदेशावरोन नोंद केली असे.