सातबारा Watch

← दुडगांव

Ferfar #3446 · दुडगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
169/12
Talathi
गणेश रमेश कोळी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 मा अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र कक्ष4-/कुका-3/अति/ज.भो.-1/एसआर-03/2026 -ई 3368603 दि.7/08/2026 चा आदेश आलेवरोन मौजे दुडगाव येथील गट न 169/12 चे क्षेत्र 1.42 हे आर पो ख.0.60 हे आर या मिळकतीचे खालीलप्रमाणे अटी व शर्तीस अधीन राहून भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 केले 1. श्री. भाऊराव दगडु घोटे, श्री. विजय दगडु घोटे, श्री. शिवराम सुका घोटे हे वर नमूद मिळकत ही भोगवटदार वर्ग-1 म्हणुन धारण करतील. 2. प्रस्तुतच्या जमिनीचा उपयोग बिनशेती कडेस करावयाची असल्यास सक्षम अधिकारी यांचेकडून आवश्यक त्या परवानगी घेणे बंधनकारक राहील. 3. भविष्यात लेखापरिक्षणात रुपांतरण अधिमूल्य कमी वसूल केलेबाबत शक घेतल्यास त्यानुसार सदरची रक्कम सर्व संबंधितांना भरणे अनिवार्य राहील. तसेच भरणा करणेत आलेला रुपांतरण अधिमूल्य रक्कम कोणत्याही सबबीवर परत मागता येणार नाही. अन्यथा सदरची परवानगी आदेश आपोआप व्यपगत होतील, या अधिन राहुन सदर परवानगी देण्यात येत आहे. 4. प्रस्तुत मिळकत संस्था/फर्म/कंपनीस विकण्यापूर्वी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 अन्वये सक्षम प्राधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. 5. अर्ज मिळकतीचे सक्षम प्राधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय तुकडे पाडता येणार नाही. 6. सदर गटात भूसंपादन झाले असल्यास भूसंपादित क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील. 7. अर्ज मिळकतीच्या मालकी हक्काबाबत कोणत्याही महसूली अथवा दिवाणी न्यायालयात वाद प्रलंवित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांत संबंधित न्यायालयाकडून पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीचे हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहील. 8. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार जमीन मालक यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास व सदरची प्रश्नाधिन जमिनीबाबत भविष्यात कोणत्याही हितसंबंधित व्यक्तीने या जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही विवाद उपस्थित केल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास तसेच स्थळ पहाणीत जमिनीचे हस्तांतरण आदेशापुर्वीच झाल्याचे आढळून आल्यास किंवा जमीन मालकाचे त्रयस्थ इसमांबरोबर साठेखत करुन व्यवहारापोटी रक्कम स्वीकारलेली असल्याचे साठेखत लिहून घेणार यांनी निदर्शनास आणून दिल्यास सदर परवानगी रद्द होण्यास पात्र राहील, 9. सदरची परवानगी ही फक्त महाराष्ट्र शेतजमिन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 या कायद्याअंतर्गत भोगवटादार वर्ग-2 ची जमीन आहे ही बाब केवळ विचारात घेऊन शासन अधिसूचना दिनांक 4 में, 2026 मधील तरतुदीनुसार सदर जमिन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करणेस परवानगी देण्यात आली आहे. या संबंधात कुळ कायदा 1948, नागरी जमीन (कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार वा नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. वरील पैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती तसे निष्पन झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील. वरीलप्रमाणे अटी व शर्तीस अधीन राहून भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 केले.नोंद मा अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेशावरोन केली