सातबारा Watch

← पंचक

Ferfar #11548 · पंचक

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-28
Objection until
2026-08-14
Certified
—
Gat / Survey
62/1/अ/1/ब/प्लॉट/10, 62/1/अ/1/ब/प्लॉट/6, 62/1/अ/1/ब/प्लॉट/7
Talathi
चंद्रकांत देवराम वाघचौरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/07/2026 खातेदार रामशेठ भगतराम साधवानी यांच्या मौजे पंचक ता.जि.नाशिक येथील स.नं. ६२/१/अ/१/ब/प्लॉट क्र. ६,७ आणि १० ह्या मिळकतीवर विशेष वसुली अधिकारी तथा सहकार अधिकारी (प्र.श्रेणी-१) इगतपुरी जि.नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र.१/झुलेलाल/ना.पत/कलम९८/बोजेलावणे/सन २०१४ दि. १५/११/२०१४ वरोन झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक रोड यांनी जप्ती आदेश दिल्याने फेरफार क्र. ७४२२ अन्वये जप्ती बोजाची नोंद घेण्यात आली होती व सदर मिळकतीच्या गा.न.नं. ७/१२ च्या इतर अधिकारात सदर जप्ती बोजाचा शेरा “ झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नाशिकरोड यांचा जप्ती आदेश र रु ३०६०७१४/-रामशेठ भगतराम साधवानी(७४२२)” हा घेण्यात आला होता. झुलेलाल संस्थेचे तत्कालीन संचालक मंडळाच्या विरुध्द महा.सह.सं.अ. १९६० चे कलम ८८ च्या अहवाला अन्वये जबाबदारी निश्चित करण्यात आलेली रक्कम संबधिताकडून जमीन महसुलाच्या थाक्बाकीप्रमाणे वसूल करण्यासाठी महा.सह.सं.अ. १९६० चे कलम ९८ नुसार वसुली प्रमाणपत्र पारित करण्यात आले होते. सदर कलम ८८ चा अहवाल तसेच कलम ९८ च्या वसुली प्रमाणपत्रास सदर मंडळातील संचालकांनी महा.सह.सं.अ. १९६० चे कलम १५४ अन्वये अपील अर्ज क्र. ६२३/२००८ हा मा.राज्यमंत्री, सहकार महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे न्यायालयात दाखल केला होता सदर प्रकरणी मा.राज्यमंत्री, सहकार महाराष्ट्र राज्य, मुंबई क्र.एपीपी २००८/प्र.क्र.६२३/१५ स सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दि.२/३/२०१६ रोजीच्या आदेशानुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक यांचा दि. ३०/०१/२००८ चा आदेश दि. ३०/८/२००८ रोजीचा कलम ८८ चा चौकशी अहवाल व दि. २०/०९/२००८ रोजीचे वसुली प्रमाणपत्र रदद करण्यात आलेले आहे. तसेच सदर मंडळातील संचालकांनी महा.सह.सं.अ. १९६० चे कलम १५२ अन्वये अपील अर्ज क्र. २७/२०१७ हा मा.राज्यमंत्री, सहकार महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे न्यायालयात दाखल केला होता सदर प्रकरणी मा.राज्यमंत्री, सहकार महाराष्ट्र राज्य, मुंबई जा. क्र.एपीपी २०१७/प्र.क्र.२७/१५ स सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दि.१६/१/२०१८ रोजीच्या आदेशानुसार प्राधिकृत चौकशी अधिकारी कलम ८८ तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नाशिक ता.जि. नाशिक यांचा दि.४/१२/२०१५ रोजीच्या कलम ८८ नुसारचा अहवाल व मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक यांचे दि.१७/२/२०१६ रोजीचे कलम ९८ नुसारचे वसुली प्रमाणपत्र आदेश रदद करण्यात आलेले आहेत. सबब गा.न.नं.७/१२ वर दाखल असलेला बोजा व शेरा वरील तपशिलात दिलेल्या मा.राज्यमंत्री, सहकार महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दि.२/३/२०१६ व दि.१६/१/२०१८ रोजीच्या आदेशान्वये कमी करणे कामी नोंद घेतली असे. अर्ज, प्रतिज्ञापत्र, मा.राज्यमंत्री, सहकार महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशाच्या प्रमाणित प्रती व इतर अनुषंगिक कागदपत्रे दप्तरी दाखल असे.