Ferfar #208131 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265/2/59/प्लॉट/59
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
आदेशावरून
मा अपर जिल्हाधिकारी सो नाशिक यांचे कडुन क्र.मशा/कक्ष/3/7-1/भोग-2/एसआर/70/2025 नाशिक दिनांक-10/09/2025 यांचे कडील आदेशा अन्वये अर्जदार-चंद्रकांत बाबुराव काळे यांचे सर्व्हे नं-265/2/59/प्लॉट/59 क्षेत्र-135.00 चौ.मी. चे एकुण मुल्यांकन रक्कम रुपये-26,00,510/- आदेशाने मुल्यांकनाचे 15% रक्कम-3,90,080/- डिफेस चलनाचा दिनांक-08/05/2025 वरील प्रमाणे प्लॉट धारक यांनी नवीन शर्तीवर धारण केलेली जमीन भोगवटदार वर्ग-2 मधुन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणेस खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे.
1) श्री.चंद्रकांत बाबुराव काळे, रा.गंगोत्री विहार, अमृतधाम पंचवटी, नाशिक हे सदरची जमिन भोगवटादार वर्ग-1 म्हणून धारण करतील.
2) भविष्यात लेखापरिक्षणात नजराणा कमी भरणा झाला असलेबाबत शक निघाल्यास फरकाची रक्कम भरणा करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील यास अधिन राहुन परवानगी देण्यात येत आहे.
3) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार जमिन मालक यांनी प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्या मध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळून आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.
4) प्रश्नाधीन जमीन ही नविन शर्तीची व भोगवटदार वर्ग-2 ची आहे केवळ हि बाब विचारात घेऊन शासन अधिसुचना दिनांक-04 मार्च 2025 मधील तरतुदीनुसार सदर जमीन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणेस परवानगी देण्यात येत आहे.
5) सदर मिळकत बिनशेती बदल करावयाची असल्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम अन्वये सक्षम अधिकारी यांचे कडून परवानगी घेणे बंधनकारक राहील.
6) नागरी जमिन (कमाल मर्यादा धारणा विनियम) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्यक असेल तर तशी परवानगी अर्जदार जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील.
7) महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) कायदा 1961 मधील तरतुदीचा भंग होवु नये.
8) तुकडे बंदी तुकडे जोड कायदे 1947 मधील तरतुदींचा भंग होवु नये.
9) मा.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक- 25/07/2022 रोजीचे परिपत्रकाचा भंग होवु नये.
वरील प्रमाणे अटी व शर्तीस अधीन राहुन परवानगी दिली असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे भोगवटदार वर्ग-2 मधुन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणे कामी नोंद केली असे.