सातबारा Watch

← कुशेगांव

Ferfar #1055 · कुशेगांव

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
140
Talathi
ज्योती कचरु फोकणे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- आशाबाई बाळासाहेब बागलाणे रा. कुशेगांव(खाता क्रमांक862) यांचे गट/सर्व्हे क्रमांक140, लागवडीयोग्य क्षेत्र 4.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 4.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संजय सुकलाल सोनवणे , (खाता क्रमांक :-963)गट/सर्व्हे क्रमांक 140 लागवडीयोग्य क्षेत्र 4.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3862 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3237600 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3862 दिनांक 21/10/2026 अन्वये तसेच मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश कक्ष-4/कुका-4/एस.आर./375/2026 दि. 17/09/2026 अन्वये केली असे. मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश कक्ष-४/कुका-४/एस.आर./३७५/२०२६ मधील अटी व शर्ती खालीलप्रमाणे :- अटी व शर्ती १. श्रीमती. आशाबाई बाळासाहेब बागलाणे यांची जमीन श्री. संजय सुकलाल सोनवणे यांनाच विक्री करता येईल. २. श्री. संजय सुकलाल सोनवणे यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६ अ ला अधिन राहून फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी. ३. जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरून ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनु. जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, १९७४ प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील. ४. खरेदीदस्तावर धारक / सहधारक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी. ५. जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा (१५) दिवसानंतर तीन (०३) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. ६. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहील. ७. सदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन प्रस्ताव झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील. ८. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही. ९. सदर जमिनीचे साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु. २१,००,०००/- ही असून मूल्यांकनाची रक्कम रु. ३२,३७,६००/- एवढी आहे. साठेखतातील व्यवहाराच्या रक्कमेपेक्षा मूल्यांकनाची रक्कम जास्त असल्याने ती जमिनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे रक्कम रु. ३२,३७,६००/- (अक्षरी रक्कम – बत्तीस लाख सदतीस हजार सातशे रुपये मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व या बाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा झालेबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्याशिवाय सह. दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये. १०. प्रस्तुत मिळकती संबंधित भुधारकाचे एकूण क्षेत्र व लागू असलेला स्लॅब विचारात घेवुन निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नवीन भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जारी संबंधित नवीन भुधारकाचे एकूण क्षेत्र लागू असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नवीन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमूद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील. ११. प्रज्ञाधिन मिळकतीपैकी साठवण तलाव या प्रयोजनाकरीता भूसंपादन प्रस्ताव क्र. ०२/२०१९ अन्वये थेट खरेदी (सरळ वाटाघाटी) पद्धतीने प्रस्तावित भूसंपादन होणारे क्षेत्र १ हे. ७३ आर संबंधीत यंत्रणेस देणे जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील. १२. प्रश्नाधीन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसुली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील. १३. तहसीलदार इगतपुरी / ग्राम महसूल अधिकारी, कुशेगांव यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडून धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये. १४. प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निबंध लागू राहतील. अ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म) -१९६१ ब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम -१९४८ ड) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळवहिवाटविषी (सुधारणा) अधिनियम-१९७४ (1974/35) ई) सदरची परवानगी फक्त याच कायदयांतर्गत देण्यात आली आहे. या संबंधीत नागरी जमिन (कमाल) मर्यादा विनियमन) अधिनियम-१९६६ किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार व नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. वरीलपैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास व शास्तीस पात्र राहील.